ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आयसीसी टी20 विश्वचषकासाठी अखेरचा दिनांक 15 सप्टेंबर आहे. तत्पूर्वी सर्व बोर्ड आपले संघ जाहीर करण्यासाठी लगबग करताना दिसतायेत. दोन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजनेही आता आपला संघ जाहीर केला आहे. 15 सदस्य संघाचे नेतृत्व यष्टिरक्षक निकोलस पूरन करेल. तर, उपकर्णधार म्हणून आक्रमक फलंदाज रोवमन पॉवेलची नियुक्ती केली गेली.
निवड समितीचे प्रमुख असलेले दिग्गज डेस्मंड हेन्स यांनी संघाची घोषणा करताना म्हटले,
“आम्ही वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तरुण आणि अनुभव यांचे योग्य मिश्रण असलेला संघ निवडण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या सुरू असलेल्या सीपीएल व खेळाडूंच्या फॉर्मला महत्त्व दिले गेलेय.”
West Indies have announced their 15-member squad for the ICC Men's @T20WorldCup 2022 🏏
Details 👇🏻#T20WorldCuphttps://t.co/9F1EV4qwi9
— ICC (@ICC) September 14, 2022
या संघात अनुभवी सलामीवीर एविन लुईसचे पुनरागमन झाले आहे. तो 2021 टी20 विश्वचषकानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल. लेगस्पिनर यानिक कॅरिया व अष्टपैलू रेमन रिफर हे दोन अनकॅप्ड खेळाडू देखील संघाचा भाग आहेत.
वेस्ट इंडीज हा टी20 विश्वचषकातील सर्वात यशस्वी संघ आहे. त्यांनी 2012 मध्ये श्रीलंकेत झालेल्या तसेच 2016 मध्ये भारतात झालेल्या टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते. मागील वर्षी त्यांना साखळी फेरीतून बाहेर व्हावे लागले होते.
यावेळी वेस्ट इंडिज संघाला पात्रता फेरी खेळून सुपर 12 मध्ये जागा बनवावी लागेल. त्यांना पात्रता फेरीच्या ब गटात झिम्बाब्वे, स्कॉटलंड व आयर्लंडचे आव्हान पेलावे लागणार आहे. यातील अव्वल दोन संघ मुख्य फेरीसाठी पात्र होतील.
टी20 विश्वचषकासाठी वेस्ट इंडीज संघ-
निकोलस पूरन (कर्णधार), रोवमन पॉवेल, यानिक कॅरिया, जॉन्सन चार्ल्स, शेल्डन कॉट्रेल, शिमरन हेटमायर, जेसन होल्डर, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रॅंडन किंग, एविन लुईस, काइल मेयर्स, ओबेद मेकॉय, रेमन रिफर व ओडियन स्मिथ.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियात रोहित-राहुल अन् पंतची बॅट होते म्यान! आशा फक्त विराटवर; पाहा आकडेवारी
टी-20 विश्वचषकात होणार हर्षल पटेलची धुलाई? पत्रकाराच्या प्रश्नावर गावसकरांचे रोखठोक उत्तर, म्हणाले…