बांगलादेश आणि वेस्ट इंडीज यांच्यादरम्यान खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि अखेरचा वनडे सामन्यात यजमान बांगलादेशने वेस्ट इंडिजला १२० धावांनी पराभूत करत मालिकेवर ३-० ने कब्जा केला. या विजयासह बांगलादेशने वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश दिला. आक्रमक अर्धशतकी खेळी करणाऱ्या अनुभवी यष्टीरक्षक मुशफिकुर रहीमची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. तर, या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या शकीब अल हसनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
बांगलादेशने रचला धावांचा डोंगर
मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून आधीच मालिका खिशात घातलेल्या यजमान बांगलादेशने या सामन्यातही नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर लिटन दास व नजमूल होसेन लवकर बाद झाल्यानंतर अनुभवी सलामीवीर तमिम इक्बाल व दिग्गज अष्टपैलू शकीब अल हसन यांनी महत्त्वपूर्ण भागीदारी रचली.
दोघेही वैयक्तिक अर्धशतकांनंतर बाद झाले. त्यांनी अनुक्रमे ६४ व ५१ धावा केल्या. यष्टीरक्षक मुशफिकुर रहीमने ५५ चेंडूत ६४ धावांची तुफानी खेळी केली. प्रमुख अष्टपैलू मोहम्मदुल्लाने अवघ्या ४३ चेंडूंमध्ये ६४ धावांची स्पोटक खेळी करून बांगलादेशची धावसंख्या २९७ पर्यंत पोहचवली. वेस्ट इंडीजकडून रेमन रिफर व अल्जारी जोसेफ यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
वेस्ट इंडीजची कचखाऊ फलंदाजी
बांगलादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजला ऑटलीच्या रूपाने पहिला धक्का बसला. त्यानंतरही वेस्ट इंडीजचे इतर फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले. वेस्ट इंडीजकडून रोवमन पॉवेलने सर्वाधिक ४७ धावा काढल्या. इतर एकही फलंदाज ४० पेक्षा जास्त धावांच्या पुढे जाऊ शकला नाही. परिणामी, वेस्ट इंडिजचा संघ १७७ धावांवर गारद झाला. बांगलादेशसाठी मोहम्मद सैफुद्दीनने तीन तर मुस्तफिझुर रहमान व मेहदी हसन यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.
या मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत असलेल्या शाकिब अल हसनला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. त्याने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागात दमदार कामगिरी करत या पुरस्कारावर हक्क सांगितला.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! तब्बल सात खेळाडू ठरले पद्मश्री पुरस्काराचे मानकरी, भारत सरकारने केली घोषणा
भारतात पोहचण्याआधीच इंग्लडला बसला धक्का, कठोर नियमांमुळे सरावासाठी मिळणार फक्त इतके दिवस
आयएसएल २०२०-२१ : चेन्नईयीनने आघाडीवरील मुंबई सिटीला रोखले