---Advertisement---

MI vs CSK: सामनावीर ठरल्यानंतर रोहित शर्मा भावूक, जाणून घ्या काय म्हणाला?

On: सोमवार, एप्रिल 21, 2025 1:57 PM
---Advertisement---

आयपीएल 2025 स्पर्धेमध्ये सुरूवातीपासूनच रोहित शर्मा खराब लयीत होता. मुंबई इंडियन्स संघासाठी रोहितचा फॉर्म अत्यंत महत्त्वाचा आहे. पण आता अखेर चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध सामन्यात रोहित शर्मा जबरदस्त फलंदाजी करून पुनरागमन केले आहे आणि मुंबईला शानदार मिळवून दिला. रोहितने या सामन्यात 45 चेंडूत नाबाद 76 धावा केल्या त्यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 6 षटकार झळकावले. त्यानंतर रोहितला या सामन्याचा सामनावीर पुरस्कार देखील देण्यात आला. यानंतर रोहित शर्मा काय म्हणाला, जाणून घेऊया.

रोहित शर्माला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला. सामनावीर म्हणून रोहित शर्माचं नाव घोषित केल्यानंतर वानखेडे स्टेडियममध्ये रोहित-रोहित नावाचा चाहत्यांनी जल्लोष सुरू केला. फक्त मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनी नव्हे तर सीएसकेच्या पिवळ्या जर्सीमधील चाहत्यांनी देखील रोहितच्या नावाचा जयजयकार केला.

रोहित जेव्हा चर्चा करण्यासाठी आला तेव्हा हर्षा भोगलेंनी रोहितला सांगितले की, सीएसकेचे चाहतेही तुझ्या नावाचा जयघोष करत आहेत, यावर रोहित शर्मा म्हणाला, हे क्रिकेटवर प्रेम करणारे चाहते आहेत आणि हिच खरी वानखेडे स्टेडियमची खासियत आहे. चाहत्यांना चांगल्या क्रिकेटचा आनंद घ्यायचा असतो आणि आमच्यासाठी आजचा सामना खूपच चांगला होता.

रोहित शर्मा त्याच्या फॉर्मबद्दल बोलताना म्हणाला, मी गेल्या कित्येक वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे फॉर्ममध्ये नसताना स्वत:वर शंका घेणं किंवा अविश्वास दाखवत वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करणं ही खूप साधी गोष्ट आहे. पण माझ्यासाठी साध्या गोष्टी समजून घेत त्यावर योग्य विचार करणं महत्त्वाचं होतं. आपल्याला कसं खेळायचं आहे याचा विचार करणं खूप महत्त्वाचं असत.

रोहित शर्माच्या नावाचं स्टॅन्ड वानखेडेच्या मैदानावर तयार होणार आहे. सामनावीर ठरल्यानंतर रोहित शर्माला पुन्हा याबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा रोहित म्हणाला की, माझ्यासाठी ही खूप सन्मानाची गोष्ट आहे. मी याआधीही सांगितलं आहे की, लहान असताना एक वेळ अशी होती की, या स्टेडियममध्ये आम्हाला येण्याची परवानगी नव्हती. इतकी वर्ष या मैदानावर खेळल्यानंतर आता माझ्या नावाचं स्टॅन्ड इथे होणार आहे, ही खरंच भावूक करणारी आणि सन्मानाची गोष्ट आहे. ते स्टॅन्ड तयार झाल्यावर मी पाहताना त्यावर तेव्हा माझी प्रतिक्रिया काय असेल, मी खरंच सांगू शकत नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---