साउथम्पटन| भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एजेस बाउल स्टेडियम येथे जागतिक कसोटीत अजिंक्यपद अंतिम सामना चालू आहे. या ऐतिहासिक सामन्याच्या पहिल्याच दिवशी (१८ जून) पावसाची फलंदाजी पाहायला मिळाली. त्यामुळे पहिला दिवस एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे अपेक्षित षटकांपेक्षा कमी खेळ झाला. त्यानंतर पुन्हा पाऊस खलनायक बनल्याने चौथा दिवसाचा खेळही रद्द झाला. अशात हा सामना ड्रॉ किंवा अनिर्णित राहिला तर जेतेपद कोणाला मिळेल? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पुर्वनियोजनानुसार, हा सामना १८ जून ते २२ जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. परंतु आयसीसीने, २३ जून हा दिवस या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. कसोटी सामन्यात सहसा ३० तासांचा खेळ खेळला जातो. दरम्यान पावसामुळे किंवा इतर काही कारणास्तव एखाद्या दिवशी सामना खेळवता आला नाही किंवा पाचव्या दिवसाखेर सामना बरोबरीत किंवा अनिर्णीत सुटला तर राखीव दिवशी त्याची भरपाई करण्यात येईल.
तरीही जर हा मोठा सामना अनिर्णीत किंवा बरोबरीत संपला तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात येईल, अशी घोषणा आयसीसीने सामन्यापुर्वीच केली होती.
अशात आता पावसामुळे या सामन्याचे दोन दिवस वाया गेले आहेत. सोबतच इतर दोन दिवशीही कमी षटकांचा खेळ झाला आहे. त्यामुळे पाचव्या आणि शेवटच्या व राखीव दिवशी अधिकाधिक षटकांचा खेळ होण्याची शक्यता आहे. मात्र या दिवशीची पावसाने घोळ घातला आणि सामना अनिर्णित राहिला, तर आयसीसीच्या नियमानुसार भारत आणि न्यूझीलंड या दोन्हीही संघाना विजेता घोषित करण्यात येईल.
महत्त्वाच्या बातम्या-
नक्की झाले काय? विराट कोहली आणि दिनेश कार्तिकचा ‘तो’ व्हिडिओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न
शुभमंगल सावधान! २ वेळा लग्न रद्द झाल्यानंतर अखेर ऍडम झम्पा चढला बोहल्यावर, पाहा फोटो
आहा…भारीच की! निसर्गाच्या सानिध्यात धोनी कुटुंबांसोबत घालवतोय वेळ; व्हिडिओत दिसला वर्कआऊट करताना