---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मोहम्मद आमिरचा बाबर आझम आणि पाकिस्तान संघाबाबत मोठा खुलासा!

---Advertisement---

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी (ICC Champions Trophy 2025) पाकिस्तानचा माजी दिग्गज वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने (Mohammad Amir) मोठं विधान केलं आहे. आमिरने पाकिस्तान संघ आणि बाबर आझम (Babar Azam) विषयी भाष्य केलं आहे. नेमकं काय म्हणाला आमिर याबदद्दल जाणून घेऊया.

चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान पाकिस्तान संघ आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाचे माजी खेळाडू अधिक उत्साही आहेत. यावर मोहम्मद आमिरने पाकिस्तान संघ आणि बाबर आझम यांच्यावर विश्वास दाखवत स्पर्धेत ते चांगली कामगिरी करतील अशा भावना व्यक्त केल्या आहेत.

आमिरने सोशल मीडियावर ‘एक्स’ पोस्टद्वारे लिहिले आहे की, “सगळ्यांनी काळजी करू नका, पाकिस्तान संघ आणि बाबर आझम चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगला खेळ खेळतील माझे शब्द लक्षात ठेवा.”

पाकिस्तान संघाला खूप दिवसानंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पूर्वी पाकिस्तानच्या यजमानपदाखाली शेवटची स्पर्धा 1996 मध्ये विश्वचषक स्वरूपात खेळली गेली होती. आत्ता जरी पाकिस्तान स्पर्धेचे यजमान असले तरी भारतीय संघ त्यांचे सर्व सामने दुबईत खेळणार आहे.

पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी घरच्या मैदानावर न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकाविरुद्ध वनडे मालिका खेळली. मालिकेमध्ये पाकिस्तानने 3 सामने खेळले, ज्यामध्ये त्यांनी दोनदा पराभव पत्करून मालिका गमावली. स्पर्धेच्या फायनल सामन्यात पाकिस्तानसमोर न्यूझीलंड संघाचं आव्हान होतं. पण न्यूझीलंडने पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव करत शानदार विजय मिळवला.

पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम मागच्या काही सामन्यात चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याने 3 सामन्यात 10, 23, 29 अशा धावा केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तोंडावर बाबर आणि पाकिस्तान संघाची अशी कामगिरी त्यांच्या चाहत्यांसाठी चिंतेचा विषय बनली आहे.

हेही वाचा-

WPL; अटीतटीच्या लढतीत दिल्लीचा शानदार विजय! मुंबईचा 2 विकेट्सने पराभव
पुलवामा शहीदाच्या मुलाची U-19 संघात निवड; देशाला अभिमान
हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम..! अशी कामगिरी करणारी दुसरीच महिला खेळाडू

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---