आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने म्हणजेच आयसीसीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी खूप वेगाने व्हायरल झाली आहे. खरं तर आपण बर्याचदा पाहिलं असेल की कर्णधार क्रिकेटच्या मैदानावर पार्ट टाईम गोलंदाज म्हणून फलंदाजांचा वापर करतो. ज्यावर आयसीसीने एक मिम्स शेअर केले आहे. आयसीसीने शेअर केलेल्या मिममध्ये दोन फोटो आहेत. एक आयफिल टॉवरचा आणि दुसरे म्हणजे विद्युत ट्रान्समिशन टॉवर. या मिम्सच्या माध्यमातून आयसीसीने फलंदाजांची खिल्ली उडविली आहे.
पार्ट टाईम गोलंदाजी करणारे वरच्या फळीतील फलंदाजांवर मिम आयसीसीने शेअर केले आहे. आयसीसीने लिहिले आहे की हे फलंदाज गोलंदाजी करताना स्वत:ची गोलंदाजी आयफिल टॉवर प्रमाणे समजतात. पण प्रत्यक्षात त्यांची गोलंदाजी ही विद्युत ट्रान्समिशन टॉवर सारखी आहे. कोरोना साथीच्या रोगामुळे बराच काळ आयसीसी स्पर्धा नव्हती. दरम्यान, आयपीएल आयोजित केल्याने क्रिकेटच्या चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन झाले आहे.
How batsmen think they bowl How batsmen bowl pic.twitter.com/SxUjEYRCJQ
— ICC (@ICC) November 15, 2020
आंतरराष्ट्रीय क्रिकेट बऱ्याच काळापासून बंद होते. पण सप्टेंबरमध्ये झिम्बाब्वे संघाने पाकिस्तान दौरा केला आणि आता भारतीय संघदेखील ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यावर भारतीय संघ तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासह भारतीय संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकाही खेळणार आहे. 27 नोव्हेंबरला भारत पहिला वनडे सामना खेळेल. वनडे आणि टी-20 मालिका 7 डिसेंबर पर्यंत सुरू राहील.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये 17 डिसेंबरपासून पहिला कसोटी सामना सुरु होईल. महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या कसोटीनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भारतात परतणार आहे. जानेवारीत विराट वडील होणार आहे, त्यामुळे त्याला पालकत्व रजा मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियाचा ‘हा’ पठ्ठ्या भारताविरुद्ध कोणत्याही क्रमांकावर खेळण्यास तयार
‘असे’ ठरणार कसोटी चॅम्पियनशीपमधील अव्वल दोन संघ; भारतासाठी वाट कठीण
“विराट जागतिक क्रिकेटमधील सामर्थ्यवान खेळाडू”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
‘डेमियन फ्लेमिंग’… पहाट स्वप्न सत्यात उतरलेले पाहिलेला ऑसींचा एकमेव गोलंदाज
‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी
सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही