तुम्ही क्रिकेटचे आणि आयपीएलचे फॅन आहात म्हटल्यावर तुम्ही, आयपीएलच ऑक्शन नेहमीच पाहत असताल. त्या ऑक्शनमध्ये पंजाब किंग्सच्या म्हणजेच पूर्वाश्रमीच्या किंग्स इलेव्हन पंजाबच्या ऑक्शन टेबलवर तुम्हाला दोन चेहरे नेहमी दिसत असतील. एक असते बॉलिवूडची डिम्पल क्वीन प्रीती झिंटा आणि दुसरी व्यक्ती बिझनेस टायकून नेस वाडिया. दोघेही टीमचे को-ओनर. ऑक्शन टेबलवर शेजारी-शेजारी बसून आणि त्यानंतर ग्राउंडवर आपल्या टीमला एकसाथ चीअर करणाऱ्या या दोघांमध्ये, कधीकाळी असं काही मॅटर झाला होता की, दोघांना कोर्टाची पायरी चढायला लागलेली.
आपण नक्की झालं काय हे पाहण्याआधी काही काळ मागे जाऊ. प्रीती बॉलीवूड गाजवत होती आणि भारतातल्या टॉप बिझनेस ग्रुप असलेल्या वाडिया ग्रुपची सुत्रे नेस वाडियांकडे आलेली. अशात दोघांची ओळख झाली आणि हळूहळू दोघे रिलेशनमध्ये आले. २००५चा तो काळ. सगळीकडे या कपलची चर्चा व्हायला लागली. त्या दोघांनी पण कधीच आपलं रिलेशन लपवलं नाही. अशात आयपीएल आली आणि दोघांनी मिळून पंजाबची फ्रॅंचायजी विकत घेतली. दोघं लग्न करणार इथपर्यंत चर्चा झाली.
हेही पाहा- एक्स-कपल प्रीती आणि वाडियाच मॅटर कोर्टापर्यंत गेलता
अचानक माशी शिंकली आणि २००९ ला दोघांचा ब्रेकअप झाला. नेसने एका पार्टीत प्रीतीवर हात उचलल्याने ब्रेकप झाल्याचं सांगितलं गेलं. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड हे नातं संपलं असलं तरी, आपलं बिझनेस रिलेशन ठेवण्याचा निर्णय मात्र त्यांनी घेतला. ऑक्शनमध्ये रणनीती आखताना आणि त्यानंतर स्टेडियममध्ये जाऊन आपल्या टीमला सपोर्ट करताना हे दोघे पण दिसायचे. तेही एकत्रच.
पुढे २०१४चा सिझन संपला आणि पंधरा दिवसात १३ जूनला बातमी आली की, प्रीती झिंटाने नेस वाडिया विरोधात पोलिसात तक्रार केली. विनयभंग, अपमानित केल्याचा, नेसपासून आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप तिने ठेवला. चौकशीला सुरुवात झाली. प्रीतीने आपल्या तक्रारीत म्हटलेलं, “३० मे रोजी वानखेडे स्टेडियमवर तिकीटांच्या वाटपावरून नेस वाडियाने मला सर्वांसमक्ष अपमानित केलं आणि माझा हात ओढून मला बाजूला केले. त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे.” पुरावे म्हणून प्रीतीने आपल्या हातावरील व्रणांचे फोटो पोलिसांना दिले. प्रकरण चांगलेच तापले. प्रीतीने फेसबुकवरून अनेक अशा गोष्टींचा खुलासा केला ज्यामुळे, वाडिया यांच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली.
प्रीती एवढ्यावरच थांबली नाही. तिने त्यावेळचे मुंबईचे पोलीस कमिशनर राकेश मारिया यांनाही लेटर लिहिले. तिने आधीच्या काही घटना त्या लेटरमध्ये लिहिल्या. नेस वाडियाने यापूर्वी आपल्याला सिगरेटचे चटके दिल्याचा खुलासा तिने केला.
इकडे इतके दिवस शांत असलेले नेस वाडिया अखेर बोलले. प्रीतीने लावलेले सारे आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. असा फिल्मी डायलॉग मारत त्यांनी आपली बाजू मांडली. दोन महिन्यांनी जेन गुडईनफ नावाच्या अमेरिकन बिझनेसमनने मुंबई पोलिसांना ईमेल करत प्रीती आणि नेसचं भांडण सोडवायचा प्रयत्न आपण केला होता, असं सांगितलं. प्रकरण चिघळत होतं.
शेवटी या प्रकरणाचा काय होणार असं वाटत असतानाच. ऑक्टोबरमध्ये दोघांनी प्रकरण मिटवायचे ठरवले. नेस वाडियाने माफी मागावी ही अट प्रीतीने ठेवली. आधी वाडियांनी नकार दिला, पण शेवटी त्यांनी माघार घेत प्रकरण मिटवायला सॉरी म्हटलंच. दोन वर्षात आपल्या बाजूने साक्ष देणाऱ्या जेन गुडईनफसोबतच प्रीतीने लग्नगाठ बांधली आणि ती संसारात रमली.
कधीकाळी एक्स कपल असलेले नेस आणि प्रीती आजही आपले बिझनेस रिलेशन टिकवून आहेत. झालं गेलं ते विसरलेत. ते नेहमी ग्राउंडवर येतात आपल्या टीमला सपोर्ट करताना दिसतात. पंजाबचे ओनर आपल्या सर्व जबाबदार्या ते पार पडतात. आता त्यांना फक्त एकाच गोष्टीची गरज आहे. ती म्हणजे आयपीएल ट्रॉफीची.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शारीरिक व्यंगावर मात करत ‘हे’ ५ क्रिकेटर्स बनले दिग्गज, टीम इंडियाच्या २ खेळाडूंचा समावेश