लंडन। लॉर्ड्स मैदानात इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात 9 ते 12 आॅगस्ट दरम्यान कसोटी सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारताला एक डाव आणि 159 धावांनी पराभूत केले.
इंग्लंडकडून वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने या सामन्यात भारताचे दुसऱ्या डावात महत्त्वाच्या विकेट घेत इंग्लंडच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. पण त्याच्या बाबतीत सामना प्रसारकांकडून एक मजेदार चूक घडली.
या सामन्याच्या चौथ्या दिवशी रविवारी (12 आॅगस्ट) दुसऱ्या डावात 31 वे षटक ब्रॉड टाकत होता. या षटकात त्याने भारताचा कर्णधार विराट कोहली आणि दिनेश कार्तिकला सलग दोन चेंडूत बाद केले. त्यामुळे त्याला हॅट्रिकची संधी होती.
यावेळी प्रसारकांनी स्क्रिनवर त्याचे नाव दाखवण्याऐवजी त्याचे वडील आणि इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू ख्रिस ब्रॉड यांचे नाव दाखवले. म्हणजे टेलिव्हिजन स्क्रिनच्या खालच्या बाजूला असे पहायला मिळाले की ‘ख्रिस ब्रॉडला हॅट्रिकची संधी.’
ख्रिस ब्रॉड हे इंग्लंडकडून 25 कसोटी सामने खेळले असून यात त्यांनी तर 39.54 च्या सरासरीने 1661 धावा केल्या आहेत. तर 34 वनडे सामन्यात 40.02 च्या सरासरीने 1361 धावा केल्या आहेत.
तसेच त्यांनी प्रसारक म्हणूनही काम केले आहे. सध्या ते क्रिकेट अधिकारी म्हणून कर्यरत आहेत. त्याचबरोबर ते आयसीसीच्या मॅच रेफ्रींच्या एलीट पॅनेलचेही सदस्य आहेत.
स्टुअर्ट ब्रॉडने लॉर्ड्स कसोटीत दुसऱ्या डावात 4 विकेट घेतल्या आहेत. आता इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात तिसरा कसोटी सामना शनिवारी, 18 आॅगस्टपासून सुरु होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–हरमनप्रीत कौरची किया सुपरलीगमध्ये धमाकेदार खेळी
–जेव्हा आयसीसीच्या क्रमवारीत सर्वच खेळाडू येतात अव्वल स्थानी
–हार्दिक पंड्याच्या नावासमोरुन अष्टपैलू टॅग काढून टाकायला हवा