---Advertisement---

मी खेळत असतो तर डिव्हिलियर्सला कधीच मिस्टर ३६० म्हणून कुणी ओळखलं नसतं

On: शुक्रवार, मे 29, 2020 10:44 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा गोलंदाज व दोन विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिलेल्या श्रीसंतने ‘आपल्यावर बॅन आला नसता, तर जगाl एबी डिव्हिलियर्स मिस्टर ३६० म्हणून ओळखलं गेलं नसतं’ असे भाष्य केले आहे.

हॅलो ऍपवरील एका लाईव्ह सेशनमध्ये बोलताना तो म्हणाला, जेव्हा-जेव्हा मी एबी डिव्हिलियर्सला गोलंदाजी करायचो तेव्हा-तेव्हा तो बाद व्हायचा. तो पुढे म्हणाला की कदाचीत माझ्यावर बॅन नसता तर आज डिव्हिलियर्स ३६० म्हणून ओळखला गेला नसता. कारण मी त्याला वारंवार बाद केले असते.

माझ्यावर बंदी घातली गेल्यानंतरच एबीला मिस्टर ३६० डिग्री म्हणून ओळखले जावु लागल्याचेही या सेशनमध्ये श्रीशांत म्हणाला.

“मला एबीबद्दल आदर आहे. परंतु त्याला मी आयपीएल किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अनेक वेळा बाद केले आहे. मी त्याला कसोटीत ६-७ वेळा बाद केले आहे. विश्वचषकातही मी त्याला बाद केले आहे,” असेही एबीबद्दल श्रीशांत पुढे म्हणाला.

श्रीशांतने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळाताना १६ आंतरराष्ट्रीय सामन्यात ३४.१७च्या सरासरीने ४० विकेट्स घेतल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---