fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

सचिनच्या आयपीएलमधील विकेटने ‘त्या’ भारतीय गोलंदाजाला मिळाले होते अतिशय महागडे गिफ्ट

मुंबई । क्रिकेट जगतात अनेक खेळाडू ‘मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर’ बरोबर क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहत असतात. अनेक खेळाडू जीवतोडून मेहनत करत हे स्वप्न पूर्ण करतात. जर एखाद्या युवा खेळाडूंने सचिनला आपल्या गोलंदाजीवर बाद केले तर त्याला ती विकेट म्हणजे एक मोठ्या ट्रॉफी समान आहे. 

भारताचा माजी क्रिकेटपटू ऑफ स्पिनर प्रज्ञान ओझा याने आयपीएलच्या कारकीर्दीत सचिन तेंडुलकरला बाद करण्याचा करिश्मा केला होता. सचिन तेंडुलकरची विकेट घेतल्यानंतर प्रज्ञान ओझाला फ्रेंचायझीकडून बक्षीस देखील मिळाले होते.

2009 साली प्रज्ञान ओझा डेक्कन चार्जर्स च्या संघाकडून खेळत होता.  डेक्कन चार्जर्स चा सामना मुंबई इंडियन्स बरोबर होता. या सामन्यापूर्वी संघ मालकाने प्रज्ञान ओझाला बोलून घेऊन सांगितले की, सचिन तेंडुलकरची विकेट घेतली तर स्पेशल गिफ्ट मिळेल. एका मुलाखतीत प्रज्ञान ओझाने याचा खुलासा केला.

“दक्षिण आफ्रिका येथे खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या सामन्यात मुंबई आणि डेक्कन चार्जर्स या दोन्ही संघात डरबन येथे सामना सुरू होता. सामना सुरू होण्यापूर्वी एक संघमालक माझ्याकडे आले जे की हैदराबाद क्रिकेट असोसिएशनच्या सिस्टीमचा भाग होते. ते मला लहानपणापासून ओळखत होते. मी दक्षिण आफ्रिकेत चांगली गोलंदाजी करत होतो. ते मला म्हणाले, जर मी सचिन तेंडुलकरची विकेट घेतली तर एक स्पेशल गिफ्ट म्हणून घड्याळ देईन.”

“या सामन्यात मी अति उत्साहाने गोलंदाजी केलो आणि सचिन तेंडुलकरची विकेट घेतलो. संघ मालकाला माहीत होते की मला घडाळ्याचा शौक होता. म्हणून मला गिफ्ट म्हणून महागडे घड्याळ भेट दिले,” असे प्रज्ञान ओझाने सांगितले .

या सामन्यात प्रज्ञान ओझाने केवळ सचिन तेंडुलकरची विकेट घेतला नाही तर डेक्कन चार्जर्सच्या संघाला बारा धावांनी विजय देखील मिळवून दिला. त्याच्या या बहारदार प्रदर्शनामुळे सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.

त्यानंतर सचिन तेंडुलकर आणि प्रज्ञान ओझाने अनेक वर्षे एकत्र मिळून क्रिकेट खेळले. विशेष म्हणजे ज्या मालिकेनंतर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तीच मालिका प्रज्ञान ओझाची शेवटची मालिका ठरली. वानखेडेच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात त्याने दहा विकेट घेतले होते तरी देखील त्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली नाही.

You might also like