काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलिया क्रिकेटने त्यांचे २ दिग्गज गमावले आहेत. ४ मार्च रोजी सकाळी रॉड मार्श यांचे निधन झाले तर संध्याकाळी फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे वयाच्या ५२ व्या वर्षी आकस्मिक (Shane Warne Dies Of Heart Attack) निधन झाले. त्यांच्या निधनानंतर क्रिकेटविश्वातून त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. अजूनही चाहते त्यांच्या जुन्या किस्स्यांची आठवण काढताना दिसत आहेत. त्यांचा असाच एक किस्सा माजी भारतीय कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्याशी संबंधित आहे. त्यावेळी गांगुलीने वॉर्नला ऑस्ट्रेलिया संघाचे सर्वात मोठे प्रतिद्वंद्वी इंग्लंड संघाची जर्सी घालण्यासाठी मजबूर केले होते.
काय होता तो किस्सा?
तर झाले होते असे की, आयसीसी चँपियन्स ट्रॉफी २०१७ सुरू होती. या स्पर्धेदरम्यान इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS Match) संघात एक सामना होणार होता. या महामुकाबल्यावर सर्वांच्या नजरा लागून होत्या. याच सामन्यावेळी वॉर्न आणि गांगुलीमध्ये शर्यत (Bet Between Ganguly & Warne) लागली होती की, कोणता संघ हा सामना जिंकेल?. गांगुलीच्या मते इंग्लंड संघ हा सामना जिंकणार होता, तर वॉर्नचा पाठिंबा ऑस्ट्रेलिया संघाला होता.
दोघांमध्ये या सामन्यावरून शर्यत लागली आणि त्यांच्यात ठरवले गेले की, जर गांगुलीने शर्यत हारली तर तो ऑस्ट्रेलिया संघाची जर्सी घालणार. याउलट जर वॉर्नने शर्यत हारली तर त्याला इंग्लंड संघाची जर्सी परिधान करावी लागणार होती.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात झालेला तो सामना इंग्लंडने ४० धावांनी जिंकला होता. डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर हा निकाल लावण्यात आला होता. परिणामी वॉर्नला इंग्लंड संघाची जर्सी घालावी लागली होती. वॉर्नने शर्यतीचा सन्मान करत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील उपांत्य सामन्यापूर्वी इंग्लंड संघाची जर्सी (Warne Wore England Jersey) घातली होती. आपल्या या शर्यतीबद्दल त्यांनी कॅमेरापुढे माहितीही दिली होती.
आवडत्या मैदानात वॉर्नवर होणार अंतिम संस्कार
थायलंडमधील कोह सामुई येथे हृदयविकाराच्या झटक्याने वॉर्नचे निधन झाले आहे. तो मृत्यूपूर्वी गेल्या काही दिवसांपासून आपले वजन कमी करण्यारसाठी डाएटवर होता. असे म्हटले जात आहे की, वॉर्नच्या आवडत्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर त्याच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. त्याच्या अंतिम संस्कारासाठी जवळपास १ लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
IPL 2022: हार्दिक नेतृत्त्व करणाऱ्या गुजरातचे काय आहे बलस्थान आणि कमजोरी, कसा आहे संघ? घ्या जाणून
धोनीचा नवा लूक पाहिलात का? आयपीएल २०२२ मध्ये दिसणार नव्या हेअरस्टाईलसह, व्हिडिओ व्हायरल
आवडत्या मैदानात दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नवर होणार अंतिम संस्कार! १ लाख लोक लावतील उपस्थिती