गांगुलींसाठी ‘ते’ वर्ष कोहलीपेक्षाही वाईट गेले होते, पण जबरदस्त पुनरागमनासह दिले होते प्रत्युत्तर; विराटही…

भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याने टी-२० विश्वचषकानंतर स्वतःच्या इच्छेने टी-२० संघाचे कर्णधापद सोडले होते. त्यानंतर आता विराटला त्याची इच्छा नसताना देखील एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडण्याची वेळ आली आहे. रोहित शर्माच्या रूपात भारताच्या एकदिवसीय संघाला नवीन कर्णधार मिळाला आहे. तत्पूर्वी रोहितने विराटनंतर टी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. आज विराट ज्या स्थितीत आहे, अगदी तशाच स्थितीत एकेकाळी माजी भारतीय कर्णधार आणि वर्तमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली देखील होते.

विराट कोहली (virat kohli) याने भारताच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व २०१७ मध्ये स्वीकारले होते. विराटच्या नेतृत्वात संघाने अनेक मालिकांमध्ये विजिय मिळवला, पण संघाला आयसीसी विश्वचषक स्पर्धेचे जेतेपद मात्र जिंकता आले नाही. मागच्या महिन्यात पार पडलेल्या टी-२० विश्वचषकात तर विराटच्या नेतृत्वातील भारतीय संघाने खूपच निराशाजनक प्रदर्शन केले होते.

अशात आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने विराटला सन्मानजनक पद्धतीने एकदिवसीय संघाच्या कर्णधापदावरून पायउतार होण्याची संधी दिली होती, पण विराटने ही गोष्ट मान्य केली नाही.

बीसीसीआयने (bcci) विराटला कर्णधापदावरून पायउतार होण्यासाठी ४८ तासांपर्यंत वाट पाहिली, पण त्याने हा निर्णय घेतला नाही आणि अखेर बुधवारी (८ डिसेंबर) बीसीसीआयने रोहित शर्माला एकदिवसीय संघाचा नवीन कर्णधार घोषित केले. यावेळी बीसीसीआयने विराटला पदावरून हटवण्याविषयी कसलीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली (sourav ganguly) यांच्यावर देखील २००५ मध्ये अशीच वेळ आली होती, पण त्यांनंतर गांगुलींनी जबरदस्त पुनरागमन करून दाखवले होते. त्यावेळी कर्णधापद काढून घेण्यामागे गांगुलींनी प्रशिक्षक ग्रेग चॅपलसह संपूर्ण सपोर्ट स्टाफला कारणीभूत ठरवले होते. २००३ मध्ये भारतीय संघ गांगुलींच्या नेतृत्वात विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता, पण २००५ मध्ये खराब प्रदर्शनामुळे गांगुली सर्वांच्या निशाण्यावर आले होते. त्यावेळी प्रशिक्षक चॅपलने बीसीसीआयला गांगुलींविषयी तक्रार करणारा एक इमेल केला होता. त्यांनी केलेला हा मेल नंतर लीक होऊन जगासमोर देखील आला होता.

या सर्व घडामोडांनंतर गांगुलींकडून संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होती आणि त्यांना पुढे संघातून देखील वगळले गेले होते. २००५ नंतर गांगुलींना थेट २००७ साली एकदिवसीय सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी त्यांनी पुनरागमनात दमदार ९८ धावांची खेळी केली होती. त्यानंतर गांगुलींना २००७ मध्ये एकूण ३२ एकदिवसीय सामने खेळले आणि त्यातील १२ सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी केली. त्यांनी संपूर्ण वर्षात केलेल्या कामगिरीसह त्यांच्या टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

त्यामुळे आता विराटही एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुढे कशी कामगिरी करतो हे पाहावे लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

विराटला वनडेच्या नेतृत्त्वपदावरून हटवल्यानंतर गांगुलींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘त्याला विनंती केलेली…’

‘त्याच्यावर गांगुलीप्रमाणेच अन्याय’; विराटला कर्णधारपदावरून हटविल्यानंतर चाहत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

दक्षिण आफ्रिका आहे भारताचा ‘फायनल फ्रंटियर’, त्यांच्याच मायभूमीत त्यांना धूळ चारत ‘विराटसेना’ घडवणार इतिहास!

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.