विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघ इंडियन प्रीमियर लीगच्या सध्याच्या हंगामात चांगली कामगिरी करत आहे. आयपीएलच्या १४ व्या हंगामात आरसीबीने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत. त्यापैकी चार सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव नाशिक करावा लागला आहे. आश्चर्यकारक गोष्ट अशी की, आरसीबीने प्रथमच स्पर्धेतील आपले पहिले चार सामने जिंकले. बंगळुरूचा संघ सध्या गुणांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र, यादरम्यान विराट कोहलीला सातत्याने एक प्रश्न विचारला जात आहे की, ३७ चेंडूंमध्ये शतक ठोकणाऱ्या फलंदाजाला आरसीबी संघ व्यवस्थापन संधी का देत नाही?
३७ चेंडूमध्ये शतक ठोकणारा फलंदाज पदार्पणाच्या प्रतीक्षेत
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने केरळचा युवा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद अझरुद्दीनला या हंगामाच्या लिलावात केवळ २० लाख रुपयांमध्ये खरेदी केले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये अझरुद्दीनने आपल्या धमाकेदार फलंदाजीने विरोधी गोलंदाजांमध्ये धाक निर्माण केला होता.
केरळच्या या युवा फलंदाजाने ५४ चेंडूत ९ चौकार आणि ११ षटकारांच्या मदतीने मुंबईविरुद्ध १३७ धावांची दणदणीत खेळी केली. त्याने अवघ्या ३७ चेंडूत शतक पूर्ण केले होते. रिषभ पंत (३२ चेंडू) आणि रोहित शर्मा (३५ चेंडू) नंतर भारतीय फलंदाजांद्वारे ठोकलेले हे तिसरे सर्वात वेगवान टी२० शतक आहे.
केरळचे प्रतिनिधित्व करतो अझरुद्दीन
मोहम्मद अझरुद्दीन हा केरळमधील कसरगोड जिल्ह्यातील थलंग्रा गावचा आहे. २०१५ पासून तो केरळकडून खेळतो. टी२० क्रिकेटमध्ये त्याने आतापर्यंत २५ सामन्यांत २२.५५ च्या सरासरीने आणि १२७ च्या स्ट्राईक रेटने ४५१ धावा केल्या आहेत. मोहम्मद अझरुद्दीन हा यष्टीरक्षक फलंदाज आहे. मात्र, बेंगलोर संघात सलामीची जबाबदारी विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्याकडे तर, यष्टीरक्षणाची जबाबदारी एबी डिव्हिलियर्स सांभाळत आहे.
अशा परिस्थितीत विराट कोहलीने एखाद्या खेळाडूला विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्यास अझरुद्दीनला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. या हंगामात आरसीबीने आतापर्यंत रजत पाटीदार, शाहबाझ अहमद व वॉशिंग्टन सुंदर या फलंदाजांना तिसऱ्या क्रमांकावर संधी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
RCB vs DC : दिल्लीचा विजयरथ रोखणार का आरसीबी? जाणून घ्या कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
आरसीबीविरूद्ध दिल्लीला भासणार या खेळाडूची कमतरता
कोरोना लसीकरणाबाबत बीसीसीआयची दुटप्पी भूमिका, भारतीयांना लस देणार तर परदेशी खेळाडू