सध्या भारतीय संघ 2023 मध्ये मायदेशात खेळल्या जाणार्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत व्यस्त आहे. विश्वचषकानंतर लगेचच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत संघातील सर्व वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असून त्यात वेगवान गोलंदाजांचाही समावेश असेल हे निश्चित मानले जात आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ पुन्हा एकदा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला पुनरागमन करण्याची संधी देऊ शकते.
वरिष्ठ गोलंदाजांच्या अनुपस्थितीत भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) संघाच्या वेगवान आक्रमणाचे नेतृत्व करू शकतो. भुवनेश्वर गेल्या एक वर्षापासून भारतीय संघाबाहेर आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी20 मालिका त्याच्यासाठी मोठी संजीवनी ठरू शकते.
‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “निवडकर्ते वरिष्ठ गोलंदाजांना विश्रांती देऊ शकतात. अशा स्थितीत भुवनेश्वर कुमारसारख्या अनुभवी वेगवान गोलंदाजाची आपल्याला गरज आहे. त्याला पुन्हा बोलावले जाऊ शकते.”
नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये भुवनेश्वर कुमारने चमकदार कामगिरी केली. त्याने 7 सामन्यात 9.31 च्या उत्कृष्ट सरासरीने 16 विकेट्स घेतल्या, ज्यामध्ये एका सामन्यात त्याने 5 विकेट्सही घेतल्या हेत्या. या कालावधीत त्याने 5.84 च्या सरासरीने धावा दिल्या. अशा स्थितीत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील कामगिरीही भुवनेश्वरसाठी संजीवनी ठरू शकते.
भुवनेश्वर कुमार 2022 च्या टी20 विश्वचषकामध्ये भारतीय संघाचा भाग होता. त्यानंतर तो नोव्हेंबर 2022 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून टी-२० मालिका खेळला होता. मात्र यानंतर त्याला संघात स्थान मिळवता आले नाही. भुवनेश्वर भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. आतापर्यंत त्याने 21 कसोटी, 121 एकदिवसीय आणि 87 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 63, एकदिवसीय सामन्यात 141 आणि टी20 मध्ये 90 विकेट्स घेतल्या आहेत. (While the World Cup is going on, Bhubaneswar luck has brightened, he will soon make a comeback in Team India)
म्हत्वाच्या बातम्या
लय भारी! मॅक्सवेलची विस्फोटक खेळी पाहून अभिनेता रितेश देशमुखही बनला फॅन, म्हणाला, ‘हारलेली लढाई…’
ज्याने सोडला कॅच त्यालाच ठोकल्या 4 चेंडूत 22 धावा, पाहा नेमकं काय घडलं