आयपीएल २०२१ स्पर्धेत ५० वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या संघांनी सर्वात आधी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे हे संघ उर्वरित सामन्यात युवा खेळाडूंना संधी देताना दिसून येत आहेत. दरम्यान चेन्नई सुपर किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघात युवा खेळाडू रिपल पटेलला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. परंतु तो पदार्पणाच्या सामन्यात विशेष कामगिरी करू शकला नाही.
दिल्ली कॅपिटल्स संघातील अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिस दुखापतग्रस्त झाल्यानंतर सध्या हा संघ एका फिनिशरच्या शोधात आहे. त्यामुळे त्यांनी स्टीव्ह स्मिथ ऐवजी रिपल पटेलला संधी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तो आपल्या पहिल्याच सामन्यात साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाने दिलेल्या १३७ धावांचा पाठलाग करताना रिपल पटेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु तो २० चेंडूंमध्ये अवघ्या १८ धावा करत माघारी परतला. या खेळीदरम्यान त्याने २ चौकार मारले होते.
कोण आहे रिपल पटेल?
रिपल पटेलबद्दल बोलायचं झालं तर, हा २६ वर्षीय खेळाडू देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये गुजरात संघाचे प्रतिनिधित्व करतो. त्याने २०१९ मध्ये गुजरात संघाकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याला जर येणाऱ्या सामन्यात संधी मिळाली तर तो दिल्ली कॅपिटल्स संघासाठी मध्यक्रमात फलंदाजीला येऊन मोठ मोठे फटके मारू शकतो. यासह गोलंदाजीमध्ये देखील मोलाचे योगदान देऊ शकतो.
Another DC ???? ready to hunt ????
Ripal Patel has earned his first IPL cap and we couldn't be more excited ????
Fireworks incoming? ????#YehHaiNayiDilli #IPL2021 #DCvCSK pic.twitter.com/IDM3855rjN
— Delhi Capitals (@DelhiCapitals) October 4, 2021
आयपीएल २०२१ स्पर्धेत लागली होती २० लाखांची बोली
रिपल पटेलला दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात २० लाखांची बोली लावून आपल्या संघात स्थान दिले होते. या खेळाडूने कधी असा विचारही केला नसेल की, पहिल्याच हंगामात त्याला पदार्पण करण्याची संधी मिळेल. त्याला सामना सुरू होण्यापूर्वी संघातील दिग्गज खेळाडू अमित मिश्राने पदार्पणाची कॅप दिली होती.
अशी आहे रीपल पटेलची कारकीर्द
रिपल पटेलच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आतापर्यंत एकूण ९ लिस्ट ए आणि १२ टी -२० सामने खेळले आहेत. त्याने २४ सप्टेंबर २०१९ रोजी पहिला लिस्ट ए सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत ९ लिस्ट ए सामन्यात एकूण १३.९ च्या सरासरीने १११ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ गडी बाद केले आहेत. यासह ११ टी -२० सामन्यात त्याने ३१.८ च्या सरासरीने २०९ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या १४ हंगामांच्या इतिहासात धोनी पहिल्यांदाच इतका वाईट खेळला, लाजिरवाणा विक्रम नावावर झाला
एकच मारला पण सॉलिड मारला; चेन्नईविरुद्ध कडक षटकार ठोकत पंतची ‘या’ विक्रमात राहुलशी बरोबरी
उथप्पाचा चेंडू पकडण्यासाठी नॉन स्ट्राईकरपर्यंत धावला यष्टीरक्षक पंत; अश्विनही म्हणे, ‘असं का करतोय?’






