आगामी आयपीएल हंगामासाठी लिलाव सोहळा १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी पार पडला. या लिलाव सोहळ्यात अनेक खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली. तर काही दिग्गज खेळाडू रिकाम्या हाती परतले आहेत. आगामी हंगामासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने देखील तगडा संघ निवडला आहे. परंतु विराट कोहलीने संघाचे नेतृत्व करण्यास नकार दिल्यानंतर, संघाचा पुढील कर्णधार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान ऑपरेशन डायरेक्टर माइक हेसन आगामी हंगामात संघाचा कर्णधार कोण असेल याबाबत खुलासा केला आहे.
आयपीएल २०२२ स्पर्धेच्या लिलावात पहिल्या दिवशी (१३ फेब्रुवारी) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने फाफ डू प्लेसिस, दिनेश कार्तिक, जोश हेजलवूड आणि अनुज रावत सारख्या खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिले होते. तसेच हर्षल पटेल आणि वनिंदु हसरंगा सारख्या खेळाडूंचे देखील या संघात पुनरागमन झाले आहे.
संघाच्या नेतृत्वाबाबत बोलताना माइक हेसन यांनी म्हटले की, “आतापर्यंत आम्ही कुठलीही चर्चा केली नाहीये. आमच्या संघात ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस सारखे तीन उत्तम लीडर आहेत. तसेच जोश हेजलवूड सारखा गोलंदाजी लीडर देखील आमच्या संघात आहे. त्यामुळे नक्कीच आम्हाला आनंद झाला आहे. आम्ही लिलाव झाल्यानंतर कर्णधार कोण होईल याबाबत निर्णय घेऊ.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “आम्हाला एक संघ म्हणून खूप आनंद झाला आहे. आम्ही आमच्या संघातील खेळाडूंना पुन्हा घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला. अनेकदा ते कठीण देखील वाटत होते. परंतु आम्हाला हर्षल पटेलला पुन्हा मिळवण्याचा खूप आनंद झाला. आम्ही पाहिलं की, सर्व अष्टपैलू खेळाडू, दीपक चाहर, शार्दुल ठाकूर आणि हर्षल पटेल सारख्या खेळाडूंवर १०.७५ कोटी रुपयांची बोली एक चांगली बोली होती. त्याला पुन्हा संघात घेऊन आम्हाला खूप आनंद झाला होता.”
आगामी हंगामासाठी असा आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ :
विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, मोहम्मद सिराज, फाफ डू प्लेसिस, हर्षल पटेल, वानिंदू हसरंगा, दिनेश कार्तिक, जोश हेझलवूड, शाहबाज अहमद, अनुज रावत, आकाश दीप, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, शेरफेन रदरफोर्ड, जेसन बेहरेनडॉर्फ, सुयश प्रभूदेसाई, चमा मिलिंद, अनिश्वर गौतम, कर्ण शर्मा, सिद्धार्थ कौल, लवनीथ सिसोदिया, डेव्हिड विली.
महत्वाच्या बातम्या :
IPL Auction: गुजरात टायटन्सने तब्बल ३.२ कोटींची बोली लावलेला कोण आहे यश दयाल?
आयपीएल लिलावात १० फ्रँचायझींनी ५५१ कोटी खर्च केल्यानंतर ‘असे’ आहेत सर्व संघ, पाहा संपूर्ण यादी