भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हा गेल्या काही सामन्यांपासून चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. इंग्लंड संघाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला ३-१ ने विजय मिळवून देण्यात रोहित शर्माने मोलाची भूमिका बजावली होती. येत्या १८ ते २२ जून दरम्यान भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
या सामन्यात रोहित शर्मासोबत सलामीला फलंदाजी करण्यासाठी शुबमन गिलला प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु भारतीय क्रिकेट चाहत्यांची पसंती शुबमन गिलला नव्हे तर संघातील आणखी एका आक्रमक सलामीवीराला जात आहे. चला तर पाहूया कोण आहे तो फलंदाज?
केएल राहुलला गेल्या काही महिन्यांपासून कसोटी संघात स्थान मिळवण्यासाठी धडपड करावी लागली आहे. तरीदेखील अनेक भारतीय क्रिकेट चाहत्यांना विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत केएल राहुलला सलामी फलंदाजी करताना पाहायचे आहे. रोहित शर्मासोबत सलामी फलंदाजीसाठी हनुमा विहारी, शुबमन गिल आणि मयंक अगरवाल देखील दावेदार आहेत. परंतु आकडेवारी आणि चाहत्यांची पसंती राहुलच्या पारड्यात झुकते माप घेताना दिसत आहे.
इंग्लंडमध्ये केएल राहुलची उल्लेखनीय कामगिरी
इंग्लंडमध्ये खेळलेल्या कसोटी मालिकेत केएल राहुलने शतक झळकावले आहे. २०१८ मध्ये जेव्हा भारतीय संघाने इंग्लंडचा दौरा केला होता. त्यावेळी केएल राहुलने ओव्हलमध्ये झालेल्या सामन्यात शतक झळकावत १४९ धावांची खेळी केली होती. त्याने याच दौऱ्यावर झालेल्या टी-२० सामन्यात देखील १०१ धावांची खेळी केली होती. याबरोबरच शुबमन गिलपेक्षा केएल राहुलला कसोटी क्रिकेटचा जास्त अनुभव आहे. तसेच त्याच्या नावे इंग्लंडमध्ये शतक देखील आहे. त्यामुळे अनेकांनी केएल राहुलला, रोहित शर्मासोबत सलामी फलंदाजी करताना पाहण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेपूर्वी होईल फिट
आयपीएल २०२१ स्पर्धेदरम्यान केएल राहुलला अपेंडिक्सच्या आजाराने त्रासला होता. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. त्याला विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी आणि इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला आणखी काही दिवस शिलक आहेत. तोपर्यंत राहुल पूर्णपणे फिट होईल असे म्हटले जात आहे.
जरी राहुलने २०१९ साली शेवटचा कसोटी सामना खेळला होता. तरीही आयपीएल स्पर्धेत तो फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आला होता. त्यामुळे त्याला रोहित शर्मासोबत सलामी फलंदाजीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारीच की! श्रीलंका दौऱ्यावरील भारतीय संघाला ‘द वॉल’ राहुल द्रविडचं देणार प्रशिक्षण?
एवढा मोठा फरक! संपूर्ण भारतीय महिला संघाचे वार्षिक मानधन आहे एकट्या कोहलीच्या पगारापेक्षाही कमी