जाणून घ्या, ऍशेस मालिका ड्रॉ झाली तरी ऑस्ट्रेलियाला का मिळाली ट्रॉफी?

लंडन। रविवारी(15 सप्टेंबर) पाचव्या ऍशेस कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 135 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडच्या या विजयामुळे 5 सामन्यांची ऍशेस कसोटी मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली.

मात्र असे असले तरी मानाची ऍशेस ट्रॉफी ऑस्ट्रेलियाला देण्यात आली. या गोष्टीचे अनेकांना आश्चर्य वाटले. पण यामागील कारण असे की ऑस्ट्रेलियाने याआधी मायदेशात झालेल्या 2017-18 च्या ऍशेस मालिकेत 4-0 असा विजय मिळवला होता.

त्यानंतर त्यांनी इंग्लंडमध्ये पार पडलेल्या 2019 च्या या ऍशेस मालिकेत बरोबरी साधली, पण पराभव स्विकारला नाही. त्यामुळे त्यांनी ऍशेसची ट्रॉफी स्वत:कडे राखण्यात यश मिळवले. याच कारणामुळे रविवारी संपलल्या 71 व्या ऍशेस मालिकेनंतर मानाची मानली जाणारी ऍशेस ट्रॉफी ऑस्ट्रेलियाला देण्यात आली.

त्याचबरोबर इंग्लंडमध्ये 2001 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाने ऍशेस मालिकेत पराभव स्विकारलेला नाही.

विशेष म्हणजे आत्तापर्यंत ऍशेस मालिका बरोबरीत सुटण्याची ही सहावी वेळ आहे. या सहा पैकी पाच वेळा ऑस्ट्रेलियाने ऍशेस ट्रॉफी स्वत:कडे राखण्यात यश मिळवले आहे. तर 1972 च्या ऍशेस मालिकेत बरोबरी झाल्यानंतर इंग्लंडने ऍशेस ट्रॉफी स्वत:कडे कायम केली होती.

बरोबरी झालेल्या ऍशेस मालिका – 

1-1 – 1938 (ऑस्ट्रेलियाला ऍशेस ट्रॉफी राखण्यात यश)

1-1 – 1962/63 (ऑस्ट्रेलियाला ऍशेस ट्रॉफी राखण्यात यश)

1-1 – 1965/66 (ऑस्ट्रेलियाला ऍशेस ट्रॉफी राखण्यात यश)

1-1 – 1968 (ऑस्ट्रेलियाला ऍशेस ट्रॉफी राखण्यात यश)

2-2 – 1972 (इंग्लंडला ऍशेस ट्रॉफी राखण्यात यश)

2-2 – 2019 (ऑस्ट्रेलियाला ऍशेस ट्रॉफी राखण्यात यश)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha अ सा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारत, ऑस्ट्रेलिया संघांनाही जमला नाही तो विश्वविक्रम केला अफगाणिस्तान संघाने!

रवी शास्त्री म्हणतात, स्वत:लाच नाही तर संघालाही निराश करत आहे हा खेळाडू…

तब्बल ४७ वर्षांनंतर ऍशेस मालिकेत घडली ‘ही’ गोष्ट

You might also like

Leave A Reply