सध्या आशिया चषकाचे वारे वाहायला सुरू झाले आहेत. अशात भारताने संघ जाहिर केल्यानंतर अनेकांनी बीसीसीआयवर ताशेरे ओढायला सुरू केले. अनेक माजी खेळाडूंनीही भारताच्या संघनिवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. अशात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने भारतीय संघनिवडीवर सकारात्मक प्रतिक्रिया देली आहे.
दोन वेळचा विश्वविजेता कर्णधार पाँटिंगने एका कार्यक्रमात मोहम्मद शामीच्या निवडीबद्दल सांगितले की, “शमी भारतासाठी बराच काळ चांगला गोलंदाज आहे. जर तुम्ही त्याची क्षमता पाहिली तर तो कदाचित कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम कामगिरी करणारा खेळाडू आहे.मला वाटते की भारतीय टी-२० क्रिकेट संघात शमीपेक्षा कितीतरी चांगले वेगवान गोलंदाज आहेत. संघात संभाव्य चार नावे असती तर तो चौथा वेगवान गोलंदाज होऊ शकला असता.”
जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतींमधून बरे होत असल्याने आशिया चषकात नवीन चेंडूची जबाबदारी घेण्यासाठी करण्यासाठी शमीचा समावेश करायला हवा होता, असे अनेकांना वाटते. आशिया कप २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत दुबई आणि शारजाह येथे होणार आहे. या स्पर्धेतील भारत प्रबळ दावेदार असल्याचे पाँटिंगने सांगितले. पॉन्टिंग म्हणाला की, “फक्त आशिया चषकच नव्हे तर कोणत्याही स्पर्धेत भारताला पराभूत करणे नेहमीच कठीण असते, परंतु मला वाटते की प्रत्येक वेळी आपण येऊ घातलेल्या टी-२० विश्वचषकाबद्दल बोलतो आणि त्यातही भारत एक मजबूत संघ असेल.
तो म्हणाला की, “एक क्रिकेट चाहता म्हणून, जेव्हा जेव्हा अशा प्रकारची सामने होतात तेव्हा त्यांना पाहणे नेहमीच चांगले असते कारण त्यात थोडासा उत्साह असतो.” पॉन्टिंग म्हणाला की, “जेव्हा प्रतिस्पर्धीचा विचार केला जातो तेव्हा ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमधील ऍशेस कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान आहे. मला खात्री आहे की भारत आणि पाकिस्तानचे लोकही याबद्दल असेच म्हणतील.”
दरम्यान, येत्या २८ ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान हे संघ आशिया चषकाच्या सामन्यात समोरासमोर येतील. .यावेळी तब्बल ोन पेक्षा जास्त वर्षानंतर हे दोन्ही संघ भिडणार असल्याने या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे हा समाना अटीतटीचा होईल हे निश्चित.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
रोहितसोबतच्या दोस्तीवर बोलताना शिखर म्हणतो, “तो माझा…”
पाकिस्तानी खेळाडूही देऊ लागले विराटला सल्ले; हा दिग्गज म्हणतोय, “त्याला स्वतःला…”
विराट-रोहितच्या साथीदारांनी बॅट ऍंड बॉलने माजवली खळबळ! थरारक सामन्यात मिळवून दिला विजय