भारताचा महत्वाचा फलंदाज श्रेयस अय्यर इंग्लंडविरुद्ध शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये खेळणार नाही. शनिवारी (11 फेब्रुवारी) या मालिकेतील शेवटच्या तीन सामन्यांसआटी भारतीय संघाची घोषणा झाली. अय्यरचे नाव या संघात नव्हते. दुसऱ्या कसोटीनंतर अय्यरच्या कंबरेला दुखापत झाली, अशा बातम्या आल्या होत्या. त्याचसोबत ग्रोइनमध्ये तान आल्याचेही सांगितले जात होते. पण याचसोबत त्याला संघातून वगण्यामागे फलंदाजाचे सुमार प्रदर्शन हेदेखील प्रमुख कारण असू शकते.
शनिवारी भारतीय संघाची घोषणा झाली, तेव्हा विराट कोहली वैयक्तिक कारणास्तव राहिलेल्या मालिकेतही खेळणार नाही, हे स्पष्ट झाले. त्याचसोबत केएल राहुल आणि रविंद्र जडेजा या दोघांचे संघात पुनरागमन झाले. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याला शेवटच्या तीन कसोटी सामन्यांमधून वगळण्यात आले. पण अय्यरला संघातून वगळण्याचे नेमके कारण सांगण्यात आले नाही. त्याला दुखापतीमुळे संघातून वगळण्यात आले असते, तर तशी माहिती बीसीसीआयकडून दिली गेली असते. अशात खराब फॉर्ममुळे त्याला संघातून बाहेर केले गेले, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मागच्या 13 कसोटी डावांमध्ये अय्यरने एकही अर्धशतक केले नाहीये. डिसेंबर 2022 मध्ये त्याने शेवटचे कसोटी अर्धशतक बांगलादेशविरुद्ध केले होते. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत अय्यर 35 आणि 13 धावा करून बाद झाला. त्याचसोबत विशाखापट्टणम कसोटीत त्याच्या बॅटमधून 27 आणि 29 धावांची खेळी निघाली.
माध्यमांमध्ये बीसीसीआय सुत्राच्या हवाल्याने असी माहिती दिली गेली आहे की, “जर श्रेयस अय्यरला दुखापतीमुळे विश्रांती दिली गेली असती, तर बीसीसीआयच्या मडिकल बुलेटिनमध्ये याविषयी उल्लेख झाला असता. पण तसा कुठलाच उल्लेख झाला नाहीये. असे म्हटले जाऊ शकते की, त्याला संघातून वगळण्यात आले आहे.”
इंग्लंडविरुद्ध शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन अश्विन, रविंद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप
इंग्लंडविरुद्ध शेवटच्या तीन कसोटी सामन्यांचे वेळापत्रक –
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने झाले आहेत. आता उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ आणि इंग्लंड संघ यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळेल. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारी रोजी राजकोट येथे सुरु होईल. त्यानंतर रांचीमध्ये 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत चौथा कसोटी सामना होईल. तर पाचवा आणि अंतिम कसोटी सामना धरमशाला येथील मैदानावर 07 मार्च रोजी सुरु होईल. (why is shreyas iyer not playing in the last three tests against england)
महत्वाच्या बातम्या –
VIDEO । ‘आई-वडिलांनी ठरवले की त्या दिवशी…’, स्वतः एमएस धोनीने सांगितले 7 नंबरच्या जर्सीमागील कारण
VIDEO । ‘आई-वडिलांनी ठरवले की त्या दिवशी…’, स्वतः एमएस धोनीने सांगितले 7 नंबरच्या जर्सीमागील कारण