आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या सुरुवातीलाच भारतीय संघाचे आव्हान जवळजवळ संपुष्टात आले आहे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तान संघाने १० गडी राखून पराभूत केले होते. तर दुसरा सामना हा उपांत्य फेरीत प्रवेश मिळवण्याचा दृष्टीने भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा होता. या सामन्यातही न्यूझीलंड संघाने भारतावर ८ गडी राखून विजय मिळवला. या सामन्याच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये मोठे बदल करण्यात आले होते. सूर्यकुमार यादवला या महत्वाच्या सामन्यात संधी देण्यात आली नव्हती. आता यामागचे कारण पुढे आले आहे.
न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय संघात २ मोठे बदल करण्यात आले होते. सूर्यकुमार यादव ऐवजी यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनला संधी दिली गेली होती. तर पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या भुवनेश्वर कुमार ऐवजी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली होती. परंतु हे दोघेही खेळाडू या मोठ्या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरले.
या कारणामुळे सूर्यकुमार यादवला नाही मिळाले प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान
नाणेफेक झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने सूर्यकुमार यादवला संघात स्थान न देण्याबाबत म्हटले की, “सूर्यकुमार यादवला पाठीची दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या ऐवजी ईशान किशनला संधी देण्यात आली आहे.” त्यानंतर बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ट्विट करत माहिती दिली होती की, “सूर्यकुमार यादवला बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने विश्रांती घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे तो हॉटेलमध्येच थांबणार आहे.” सूर्यकुमार यादवने पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ८ चेंडूंमध्ये ११ धावांची खेळी केली होती.
🚨 UPDATE: Suryakumar Yadav complained of back spasms. He has been advised rest by the BCCI Medical Team and has stayed back at the team hotel.#TeamIndia #T20WorldCup #INDvNZ
— BCCI (@BCCI) October 31, 2021
तसेच न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर ७ बाद ११० धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून जोरदार विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एकच, पण सॉलिड मारला! रोहितच्या गगनचुंबी षटकाराला पाहून खुलली चाहतीची कळी, वाजवल्या टाळ्या
पुन्हा विश्वचषकात बॅटिंग ऑर्डरवरुन गोंधळला कर्णधार विराट, २०१९ मध्येही अशीच डुबवलेली भारताची नाव