भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली हा टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज आहे. विराट या विश्वचषकातील सर्वात यशस्वी फलंदाज आहे. मात्र, तो कधीच सूर्यकुमार यादव, एबी डिविलियर्स किंवा इतर कोणत्याही धाकड फलंदाजांप्रमाणे शॉट्स खेळताना दिसणार नाही. यामागे महत्त्वाचे कारण आहे. हे कारण ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी सांगितले आहे.
काय आहे कारण?
माध्यमांशी संवाद साधताना इयान चॅपेल (Ian Chappell) यांनी टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ याच्या चेंडूवर विराट कोहली (Virat Kohli) याच्या षटकाराचा उल्लेख केला. याव्यतिरिक्त त्यांनी विराटसोबतच्या त्यांच्या जुन्या मुलाखतीचाही उल्लेख केला. चॅपेल म्हणाले की, “आम्ही काही वर्षांपूर्वी विराट कोहलीची एक मुलाखत घेतली होती. जेव्हा आम्ही विराटला विचारले की, तो फँसी शॉट्स का खेळत नाही?, त्यावर तो म्हणाला होता की, ‘या शॉट्सचा परिणाम माझ्या कसोटी खेळावर पडावा असे मला वाटत नाही.’ ही विराटबद्दलची खास बाब आहे. त्याने एवढ्या जास्त धावा चांगल्या स्ट्राईक रेटने आणि साध्या फटक्यांच्या जोरावर चोपल्या आहेत.”
विराट कोहली याच्यासाठी आयसीसी टी20 विश्वचषक 2022 स्पर्धा आतापर्यंत फायदेशीर ठरली आहे. त्याने या स्पर्धेत 4 सामने खेळले आहेत. यामध्ये फक्त तो एकदाच बाद झाला आहे. तसेच, त्याने उर्वरित 3 सामन्यात अर्धशतक झळकावले आहे. विशेष म्हणजे, तो जवळपास 2 वर्षे फॉर्मात नव्हता, पण आता त्याने जबदस्त पुनरागमन केले आहे.
या स्पर्धेत त्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाबाद 82 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सविरुद्धही नाबाद 62 धावा चोपत अर्धशतक साजरे केले होते. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात फक्त 12 धावांवर तंबूत जावे लागले होते. मात्र, नंतर चौथ्या सामन्यात त्याने बांगलादेशविरुद्ध नाबाद 64 धावा करत स्पर्धेतील तिसरे अर्धशतक साजरे केले होते. यामुळे तो या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा पहिल्या क्रमांकाचा फलंदाजही बनला. त्याने या स्पर्धेत सर्वाधिक 220 धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आधी आम्ही सचिनसोबत खेळायचो, पण आता विराटसोबत खेळतोय’, भारताच्या माजी दिग्गजाने केली तुलना
किवी संघाची टी20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये सुपर एंट्री, न्यूझीलंडचा आयर्लंडवर 35 धावांनी विजय