वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WIvsIND) यांच्यात झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात भारताने रोमांचक विजय मिळवला आहे. या सामन्यात ३ धावांनी विजय मिळवत भारतीय संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-०ने पुढे आहेत. शेवटच्या षटकापर्यंत रंगलेला हा सामना त्रिनिदाद, पोर्ट ऑफ स्पेन येथे खेळला गेला. या निर्णायक षटकादरम्यान दोन्ही संघाचे संघ सहकारी आणि कोचिंग स्टाफ चांगलेच चिंतेत दिसत होते.
बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड (Vikram Rathore) हे शांत दिसत होते. त्या दोघांचीही नजर चेंडूवरच खिळली होती. तर दुसरीकडे इशान किशन (Ishan Kishan) संघाला प्रोत्साहित करताना दिसला. शेवटच्या षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर तिसऱ्या चेंडूवर रोमारियो शेफर्डने चौकार मारला तर चौथ्या चेंडूवर २ धावा वसूल केल्या. पाचवा चेंडू वाइड गेल्याने तो पुन्हा टाकावा लागला. या चेंडूवर वेस्ट इंडिज संघाला ४ धावा मिळाल्या असत्या जर भारताचा यष्टीरक्षक संजू सॅमसन (Sanju Samson) याने उत्तम डाईव्ह मारत तो चेंडू अडवला नसता तर. यावेळी द्रविड हे काहीतरी इशारा करताना दिसले. भारताचे नशीब बलवत्तर होते शेवटच्या २ चेंडूत ३ धावा झाल्याने भारताने सामना जिंकला.
No shortage of action & emotions! 🔥 👌
🎥 Scenes as #TeamIndia seal a thrilling win in the first #WIvIND ODI in Trinidad 🔽 pic.twitter.com/rkpiPi3yOQ
— BCCI (@BCCI) July 23, 2022
भारतीय संघ ही मालिका शिखर धवन (Shikar Dhawan) याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे. पहिल्या सामन्यात नाणेफेक जरी गमावली असली तरी भारतीय फलंदाजांनी यजमानांसमोर ५० षटकात ७ विकेट्स गमावत ३०८ धावा केल्या. यामध्ये धवनने ९९ चेंडूत ९७ धावा केल्या. त्याने पहिल्या विकेटसाठी शुबमन गिलसोबत ११९ धावांची भागादारी रचली. गिल धावबाद झाला असता त्याने ५३ चेंडूत ६४ धावा केल्या. धवनने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यरसोबत दुसऱ्या विकेटसाठी ९४ धावांची भागीदारी केली. अय्यरनेही अर्धशतकी खेळी केली. त्याने ५७ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावा केल्या.
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनीही चांगली झुंज दिली. पहिली विकेट ५व्या षटकात पडल्याने भारतीय संघाच्या सामना जिंकण्याच्या आशा पल्लवित झाल्या. नंतर मात्र कायले मेयर्स आणि शमराह ब्रुक्सने दुसऱ्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केल्याने पाहुणा संघ अडचणीत आला. पुन्हा एकदा खेळपट्टीवर रुळलेल्या फलंदाजांना बाद करण्यात शार्दुल ठाकुर पुढे आला. त्याने मेयर्स आणि ब्रुक्स या दोन विकेट्स घेतल्या. मेयर्सने ७५ आणि शमराह ब्रुक्सने ४६ धावा केल्या. तर ब्रेंडन किंगने ५४ धावा करत भारतीय संघाच्या छातीत धडकी भरवली. युझवेंद्र चहलने धोकादायक ठरणाऱ्या किंग आणि रोवमन पॉवेल यांच्या विकेट घेतल्याने भारतीय संघाच्या जीवात जीव आला.
या मालिकेतील दुसरा वनडे सामना रविवारी (२४ जुलै) पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद येथे खेळला जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हाफ पँट’वर क्रिकेट, नको रे बाबा! पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर चहलचे मजेशीर प्रत्युत्तर
काउंटी क्रिकेटमध्ये खणकतय नवदीप सैनीचं नाणं, पदार्पणाच्या सामन्यातच बनला ‘मॅन ऑफ द मॅच’
अजहरूद्दीन शेर, तर धवन सव्वाशेर, वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या वनडेत ‘गब्बर’च्या नावावर मोठा विक्रम