वेस्ट इंडिज विरुद्ध भारत (WIvsIND) यांच्यात दुसरा वनडे सामना रविवारी (२४ जुलै) पार पडला. या सामन्यात भारताने २ विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली आहे. हा सामना जिंकला असला मागील सामन्यात ९७ धावांची खेळी करणाऱ्या शिखर धवनच्या विकेटची चांगलीच चर्चा रंगली आहे.
क्विन्स पार्क ओव्हल, त्रिनिदाद येथे झालेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) लवकरच बाद झाला. संघापुढे विजयासाठी ३१२ धावांचे लक्ष्य असताना धवनने त्याची विकेट अवघ्या १३ धावावरच गमावली. रोमारिओ शेफर्ड हा ११वे षटक टाकायला आला असता त्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धवनने अप्पर कट शॉट मारला असता सीमारेषेवर उभा असलेल्या कायले मेयर्सने डाईव्ह मारत तो चेंडू झेलला.
Big loss! @SDhawan25 caught by #KyleMayers at the third man.
Watch the India tour of West Indies LIVE, only on #FanCode👉 https://t.co/RCdQk1l7GU@BCCI @windiescricket#WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/iWi5D3nBlY
— FanCode (@FanCode) July 24, 2022
वेस्ट इंडिजचा कर्णधार निकोलस पूरन याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली. यजमान संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज शाय होपने त्याच्या १००व्या वनडे सामन्यात शतक केले. त्याने केलेल्या ११५, पूरनच्या ७४ धावांच्या जोरावर वेस्ट इंडिजने धावफलकावर ५० षटकात ६ विकेट्स गमावत ३११ धावासंख्या केली.
लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने पहिल्या तीन विकेट्स ७९ धावांवरच गमावल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रेयस अय्यरने आणि यष्टीरक्षक संजू सॅमसन यांनी चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी केली. यावेळी सॅमसनने त्याच्या वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक केले. त्याने ५४ तर अय्यरने ६३ धावा केल्या. भारतीय संघाला जिंकण्यासाठी शेवटच्या १० षटकात १०० धावांची आवश्यकता होती. यावेळी दीपक हुड्डा आणि अक्षर पटेल (Axar Patel) यांनी सहाव्या विकेटसाठी ५१ धावा केल्या. हुड्डाने ३३ तर पटेलने १८२.८६च्या स्ट्राईक रेटने खेळताना ३ चौकार आणि ५षटकार मारत ६४ धावा केल्या. पटेलचे हे वनडे कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठरले. भारताने ४९.४ षटकात ८ विकेट्स गमावत हा सामना जिंकला आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा वनडे सामना बुधवारी (२७ जुलै) खेळला जाणार आहे. हा सामना त्रिनिदाद, पोर्ट ऑफ स्पेनच्या क्विन्स पार्क ओव्हलवर खेळला जाणार आहे. आधीचे दोन्ही सामने याच मैदानावर झाल्याने त्या दोन्ही सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिज संघाने धावांचा पाऊस पाडला आहे. तर भारताने या दोन्ही सामन्यात रोमांचक विजय मिळवला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“माझं करीयर वाचवा”; ऑलिम्पिक विजेत्या लवलिना बोर्गोहेनने फोडली स्वतःवरील अन्यायाला वाचा
काय सांगता! मिताली राज पुन्हा दिसणार क्रिकेटच्या मैदानात, स्वत:च दिले संकेत
माजी क्रिकेटपटूने जय शहांना दाखवला आरसा; म्हणाला, “तुम्ही करताय ते क्रिकेटसाठी…”