वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाची घोषणा आज करण्यात आली. ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी ही निवड करण्यात आली असून शिखर धवनला कर्णधार तर रविंद्र जडेजाला उपकर्णधार करण्यात आले आहे.
याबरोबर भारतीय संघाचे नेतृत्त्व केलेल्या रोहित शर्मा, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रिषभ पंत व जसप्रीत बुमराह यांना मात्र विश्रांती देण्यात आली आहे. रोहित पुर्णवेळ कर्णधार झाल्यापासून टीम इंडियाने आतापर्यंत वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये अनेक कर्णधार पाहिले आहे. त्यात राहुल, पंड्या, बुमराह व पंत यांचा समावेश होतो.
(ही बातमी ६० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या mahasports.in)