वेस्ट इंडीज दौऱ्यातील एकदिवसीय मालिका भारताने जिंकली. शिखर धवनच्या नेतृत्वातील भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेतील सर्वच्या सर्व सामने जिंकले होते. आता संघाला वेस्ट इंडीजविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमसाह वैस्ट इंडीज दौऱ्यात सहभागी नाहीये आणि टी-२० मालिकेत बुमराहची जागा भरण्यासाठी संघ व्यवस्थापन एका युवा गोलंदाजाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकते.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली, तेव्हा टी-२० आणि एकदिवसीय दोन्ही संघात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि विराट कोहलीचे नाव वगळले गेले होते. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज देखील या दौऱ्यात सहभागी नाहीये. बुमराहचा वर्क लोड मॅनेज करण्यासाठी निवडकर्त्यांनी त्याला या मालिकेतून विश्रांती दिली आहे. तर दुसरीकडे विराटने मात्र ही विश्रांती मागून घेतल्याचे समोर आले होते. असे असेल तरी, बुमराहची कमी भरून काढण्यासाठी वेस्ट इंडीजविरुद्धच्या या टी-२० मालिकेत अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी केले जाण्याची शक्यता आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर आणि आवेश खान यांना खेळण्याची संधी मिळाली होती. परंतु अर्शदीप सिंगला मात्र खेळण्याची संधी मिळाली नाही. इंग्लंडविरुद्ध पदार्पणाच्या सामन्यात अर्शदीपने चांगले प्रदर्शन केले होते. पण त्यानंतर संघ व्यवस्थापनाकडून त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. मात्र, वेस्ट इंडीजविरुद्ध २९ जुलै पासून सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेत अर्शदीप खेळताना दिसेल, अशी पूर्ण शक्यता आहे.
अर्शदीपने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात ३.३ षटके गोलंदाजी केली आणि यादरम्यान ५.१४ च्या इकोनॉमीने धावा खर्च करून २ महत्वाच्या विकेट्स घेतल्या होत्या. या जबरदस्त प्रदर्शनानंतर त्याने दाखवून दिले की, भविष्यात तो भारतीय संघातील जसप्रीत बुमराहची जागा भरण्यासाठी प्रमुख दावेदार आहे.
अर्शदीपला संघात महत्व मिळण्याचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे, त्याची किफायशीर गोलंदाजी. त्याने आयपीएल २०२२ हंगामात पंजाब किंग्जचे प्रतिनिधित्व करताना १० विकेट्स घेतल्या होत्या. परंतु यादरम्यान त्याने विरोधी संघाच्या धावसंख्येवर लगाम लावण्याचे काम केले होते. विशेषतः शेवटच्या षटकांमध्ये अर्शदीप स्वतःच्या संघासाठी फायदेशीर प्रदर्शन करू शकतो. याच प्रदर्शनाच्या जोरावर त्याला भारतीय संघात निवडले गेले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रोहित काढणार वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा घाम! नेट्समध्ये सिग्नेचर पुल शॉट दिसला मारताना
केएल राहुलच्या अनुपस्थितीत कोण असेल रोहितचा ओपनिंग जोडीदार? संघ व्यवस्थापनापुढे ‘हे’ २ पर्याय
हार्दिकसारख्या ऑलराऊंडरचा शोध संपला! २५ वर्षीय खेळाडू ठोठावतोय टीम इंडियाचं दार