fbpx
Wednesday, January 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जे धोनीला जमलं नाही, ते संजू सॅमसननं करुन दाखवलं

Wicket-keepers to score 70+ runs and affect 3 dismissals in an IPL match

September 23, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: www.iplt20.com

Photo Courtesy: www.iplt20.com


खेळ कोणताही असो, त्यामध्ये विक्रम बनणे साहजिक असते. मग ते मोठ-मोठे विक्रम असो वा नकोसे विक्रम. क्रिकेटचही अगदी असंच आहे. त्यातही जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय अशा इंडियन प्रीमियर लीगमध्ये तर अनेक अनोखे विक्रम बनत असतात.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपुर्वी सुरु झालेल्या आयपीएलच्या तेराव्या हंगामातही आतापर्यंत बरेच विक्रम नोंदले गेले आहेत. सोमवारी शारजाह क्रिकेट स्टेडियमवर पार पडलेल्या चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघातील सामन्यातही एकाहून एक दमदार विक्रमांची नोंद झाली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान संघाने २० षटकात ७ बाद २१६ धावा केल्या. त्यानंतर चेन्नई संघाला राजस्थानच्या २१७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना २० षटकात केवळ २०० धावाच करता आल्या. त्यामुळे राजस्थानने तो सामना १६ धावांनी खिशात घातला.

राजस्थानच्या या विजयात यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनचा मोलाचा वाटा राहिला. त्याने फलंदाजी करण्याबरोबरच यष्टीरक्षणातही दमदार भूमिका बजावली. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत ३२ चेंडूत ७४ धावा केल्या. यात त्याच्या एका चौकाराचा आणि ९ षटकारांचा समावेश होता. तसेच यष्टीमागे त्याने फाफ डू प्लेसिस याला झेलबाद, तर सॅम करन आणि ऋतुराज गायकवाडला यष्टीचीत केले. Wicket-keepers to score 70+ runs and affect 3 dismissals in an IPL match

यासह सॅमसन हा एका आयपीएल सामन्यात ७०पेक्षा जास्त धावा करणारा आणि यष्टीमागे ३ विकेट्स चटकावणारा तिसरा यष्टीरक्षक ठरला आहे. त्याच्यापुर्वी २०११ साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळताना ऍडम गिलख्रिस्टने हा विक्रम केला होता. तर २०१७ साली कोलकाता नाईट रायडर्सचा यष्टीरक्षक फलंदाज रॉबिन उथप्पाने हा कारनामा केला होता.

एका आयपीएल सामन्यात ७०पेक्षा जास्त धावा आणि ३ विकेट्स घेणारे यष्टीरक्षक फलंदाज 

ऍडम गिलख्रिस्ट – डेक्कन चार्जर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २०११

रॉबिन उथप्पा – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राइझिंग पुणे सुपरजायंट्स, २०१७

संजू सॅमसन – राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, २०२०

महत्त्वाच्या बातम्या –

‘या’ गोष्टीमुळे गमवावा लागला सामना, राजस्थान विरुद्धच्या पराभवानंतर धोनीची प्रतिक्रिया

पाहा तर स्मिथ काय म्हणतोय, धोनी- फाफने शेवटच्या षटकात चांगले शॉट्स ठोकले, पण…

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी! आता करता येणार वानखेडे स्टेडियमची सफर

ट्रेंडिंग लेख –

चेन्नई-राजस्थान सामन्यात बनले मोठे विक्रम, संजू सॅमसनच्या नावावर झाली ‘एवढ्या’ विक्रमांची नोंद

दे घुमा के! भारतीय फलंदाज गाजवतायेत आयपीएलचा १३ वा हंगाम

मुंबई-कोलकाता सामन्यामध्ये रोहित, रसलसह ‘या’ खेळाडूंना आहे मोठे विक्रम करण्याची संधी 


Previous Post

चेन्नई-राजस्थान सामन्यात झाले मोठे विक्रम, सॅमसनच्या नावावर झाली ‘एवढ्या’ विक्रमांची नोंद

Next Post

१३ वर्षांपुर्वी टीम इंडियाच्या युवराजाने केले होते ‘ऑस्ट्रेलिया’ संस्थान खालसा

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“हा माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण”, ब्रिस्बेन कसोटीतील विजयानंतर रिषभ पंतने व्यक्त केल्या भावना

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“त्याच्याकडे असाधारण प्रतिभा आहे”, ऑस्ट्रेलियन फलंदाजाने केले रिषभ पंतचे कौतुक

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@lionsdenkxip
टॉप बातम्या

आयपीएल २०२१ : पंजाबने ग्लेन मॅक्सवेलला दिला नारळ, तर ‘या’ खेळाडूंना ठेवले संघात कायम

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC and @BCCI
टॉप बातम्या

“मी अजूनही धक्क्यातून सावरलो नाही”, भारतीय संघाच्या विजयानंतर रिकी पाँटिंग यांची प्रतिक्रिया

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

…म्हणून भारतीय संघाच्या विजयानंतर राहुल द्रविडची होतेय चर्चा

January 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

BAN vs WI : शाकिब अल हसनच्या दमदार पुनरागमनाच्या जोरावर बांग्लादेशचा विंडीजवर ६ गड्यांनी विजय

January 20, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ BCCI

१३ वर्षांपुर्वी टीम इंडियाच्या युवराजाने केले होते 'ऑस्ट्रेलिया' संस्थान खालसा

हॉटस्पॉट आणि स्निकोमीटर; नक्की भानगड आहे तरी काय भाऊ?

वॉर्नरच्या हैदराबादला मोठा झटका, मॅचविनर खेळाडू पडला आयपीएल बाहेर

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.