चेन्नई सुपर किंग्स संघाने गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाला आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यात पराभवाची धूळ चारली. या सामन्यात हार्दिक पंड्या याच्या गुजरात संघाकडे सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्याची सुवर्णसंधी होती, पण त्यांचे स्वप्न पुन्हा होऊ शकले नाही. या संपूर्ण हंगामात गुजरातच्या सर्व खेळाडूंनी आपले योगदान दिले. मात्र, त्यातही पुनरागमन करत असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्मा याने विशेष लक्ष वेधून घेतले. त्याच्या हंगामातील या कामगिरीनंतर भारतीय संघाची दारे त्याच्यासाठी पुन्हा खुली होणार काय हे पाहणे, रंजक ठरेल.
मोहित शर्मा काही वर्षांपूर्वी आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक होता. 2014 आयपीएलमध्ये त्याने पर्पल कॅप आपल्या नावे केलेली. तसेच त्याने भारतीय संघासाठी दोन विश्वचषक देखील खेळले. त्यानंतर मात्र त्याच्या कारकिर्दीत उतार आला. 2022 हंगामात कोणीही त्याच्यावर बोली न लावल्याने गुजरातने त्याला नेट बॉलर म्हणून आपल्या सोबत घेतले. त्यानंतर या हंगामात बेस प्राईसवर त्याला खरेदी केले.
या हंगामाच्या सुरुवातीचे तीन सामने खेळण्याची त्याला संधी मिळाली नव्हती. त्यानंतर मात्र त्याने संघात जागा मिळवल्यानंतर प्रत्येक वेळी आपले योगदान दिले. अगदी अंतिम सामन्यातील अखेरच्या षटकात 13 धावा वाचवण्याची जबाबदारी त्याच्यावर होती. पहिल्या चार चेंडूवर त्याने केवळ तीन धावा दिल्या होत्या. मात्र, अखेरच्या दोन चेंडूवर रवींद्र जडेजाने षटकार व चौकार वसूल करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
या संपूर्ण हंगामात त्याने आपले धारदार यॉर्कर तसेच योग्य वेळी टाकलेल्या स्लोअर चेंडूंमुळे अनेकवेळी सामन्याचा निकाल पलटवला. त्याने या हंगामात 14 सामने खेळताना 8.17 च्या इकॉनॉमी रेटने 27 बळी मिळवले. हंगामात मोहम्मद शमीनेच केवळ त्याच्यापेक्षा एक बळी अधिक मिळवला.
आगामी काळात भारताला काही द्विपक्षीय मालिका खेळायच्या आहेत. तसेच भारतात यावर्षी वनडे विश्वचषक खेळला जाणार आहे. तर पुढील वर्षी टी20 विश्वचषक खेळला जाईल. या सर्व पार्श्वभूमीवर 35 वर्षीय मोहित पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करेल का याकडे सर्वांचे लक्ष आहे.
(Will Mohit Sharma Comeback In Team India After Heroic Performance In IPL 2023 For Gujarat Titans)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लाज वाटते तू भारतरत्न असल्याची’, कुस्तीपटूंच्या आंदोलनप्रकरणी निखिल वागळेंची सचिनवर जहरी टीका
सीएसकेच्या यशामागील खरा चाणक्य! 16 वर्षांपासून सुपर किंग्सला वाट दाखवणारा ‘सुपर कोच’ फ्लेमिंग