सध्या इंग्लंडमध्ये ‘द हंड्रेड’ लीगचा दुसरा हंगाम सुरू झाला आहे. स्पर्धेतील सामने चांगलेच चुरशीचे होत आहेत. त्याचवेळी बुधवारी (१० ऑगस्ट) झालेल्या बर्मिंघम फिनीक्स विरुद्ध सदर्न ब्रेव्हज या सामन्यात बर्मिंघम संघाकडून खेळत असलेल्या २० वर्षीय विल स्मिडने ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने या सामन्यात शतक झळकावत ‘द हंड्रेड’ लीगमध्ये शतक नोंदवणारा पहिला फलंदाज होण्याचा मान मिळवला.
केवळ १०० चेंडूंच्या असलेल्या क्रिकेटच्या या नव्या प्रकारात मागील वर्षी कोणीही शतक ठोकू शकले नव्हते. बर्मिंघम संघासाठीच खेळणाऱ्या लियाम लिव्हिंगस्टोन याने मागील वर्षी सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली होती. तो विक्रम स्मिडने मोडून काढला. स्मिडने ५० चेंडूवर नाबाद १०१ धावांची खेळी केली. यामध्ये ८ चौकार व सहा गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. या लीगमध्ये जगभरातील अनेक नामवंत खेळाडू खेळत असताना, स्मिडने पहिले शतक झळकावल्यामुळे त्याचे विशेष कौतुक केले जात आहे.
WILL SMEED!! 🔥🔥
First 💯 EVER in @thehundred. 😱
Match Centre 🖥️ https://t.co/1PTF2fExpS#Edgbaston | #TheHundred pic.twitter.com/Hmjp7g2bJi
— Edgbaston Stadium (@Edgbaston) August 10, 2022
स्मिड हा काउंटी क्रिकेटमध्ये सॉमरसेटचे प्रतिनिधित्व करतो. २० वर्षीय स्मिड मागील वर्षी पाकिस्तान सुपर लीगमध्ये क्वेटा ग्लॅडीएटर्स संघासाठी खेळला होता. तिथेही त्याने ९९ धावांची आकर्षक खेळी केलेली. त्याने अद्याप इंग्लंडसाठी पदार्पण केले नसले तरी, ४९ टी२० सामन्यात त्याच्या नावे १४०० धावांची नोंद आहे. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट तब्बल १४६ इतका जबरदस्त राहिलाय.
सामन्याबद्दल सांगायचे झाल्यास, स्मिथच्या शतकामुळे बर्मिंघम संघाने प्रथम फलंदाजी करताना १०० चेंडूवर १७६ धावा बनवल्या. प्रत्युत्तरात, सदर्न ब्रेव्हज संघ प्रतिकार करू शकला नाही. त्यांना ८५ चेंडूत केवळ १२३ धावा बनवता आल्या. बर्मिंघम संघासाठी हेन्री ब्रूक्सने पाच बळी मिळवत, संघाला ५३ धावांनी मोठा विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या-
चेंडू षटकारासाठी बाउंड्रीपार जाणारच होता, पण हेटमायरने हवेत झेपावत पकडला झेल; पाहा तो अद्भुत कॅच
मराठीत माहिती- क्रिकेटर यशपाल शर्मा