रविवारी (8 मार्च) मेलबर्न (Melbourne) येथे भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध (Indian Women vs Australian Women) आयसीसी टी20 विश्वचषकातील अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात एक खास विश्वविक्रम होऊ शकतो.
या सामन्याची आत्तापर्यंत साधारण 75 हजारांच्या आसपास तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे जर अंतिम सामन्यासाठी जर 90,185 पेक्षा अधिक प्रेक्षक स्टेडियममध्ये उपस्थित राहिले तर महिलांच्या कोणत्याही क्रिडाप्रकारात आत्तापर्यंत सगळ्यात जास्त स्टेडियममधील प्रेक्षकसंख्येचा विश्वविक्रम या सामन्यात नोंदवला जाईल.
सध्या महिलांच्या कोणत्याही क्रिडाप्रकारात सर्वाधिक तिकिटविक्रीचा विक्रम 1999 च्या फिफा महिला फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात नोंदवला गेला होता. या सामन्यात तब्बल 90,185 एवढी प्रेक्षकसंख्या नोंदवली गेली. या सामन्यात अमेरिकेने चीनला पेनल्टीमध्ये 5-4 असे हरवून फुटबॉल विश्वचषक जिंकला होता.
त्यामुळे आता हा विक्रम मेलबर्न येथे होणाऱ्या महिला क्रिकेट T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मोडला जाऊ शकतो. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडची जवळपास 1 लाख प्रेक्षक क्षमता आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–ऑस्ट्रेलियाची ही खेळाडू म्हणते, मला भारताविरुद्ध खेळण्याचा तिरस्कार वाटतो, कारण…
–निवड समितीच्या नवीन अध्यक्षाचे विराटशी असलेले हे जुने नाते माहित आहे का?
–निवड समितीत ‘या’ खेळाडूचाही होऊ शकतो समावेश; सौरव गांगुली इशारा…