---Advertisement---

विराट कोहली BBLमध्ये खेळणार? IPL 2025 मध्ये मोठ्या घोषणेनंतर चर्चेला उधाण

---Advertisement---

विराट कोहली आता बाहेरच्या क्रिकेट लीग मध्ये खेळणार आहे. हो तुम्ही खरं ऐकताय, बिग बॅश‌ लीग (BBL) संघ सिडनी सिक्सर्सने घोषित केल आहे की, विराट कोहलीने त्यांच्यासोबत डील साइन केली आहे. मंगळवार 1 एप्रिल रोजी घोषित केलेल्या या विषयामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलेलं आहे. ही घोषणा चकित करणारी आहे, कारण बीसीसीआयने भारतीय क्रिकेट खेळाडूंना विदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिलेली नाही. इथे जाणून घ्या की, नक्की ही गोष्ट कितपत खरी आहे?

सिडनी सिक्सर्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट वरून विराट कोहलीसोबत डील साइन केल्याची माहिती दिली. विराट सोबत फोटो सोबत कॅप्शन मध्ये लिहिलं आहे की, आता विराट कोहली पुढच्या दोन हंगामासाठी सिडनी सिक्सर्स संघाचा हिस्सा बनला आहे.

बीबीएलमध्ये स्टीव स्मिथ, सिडनी सिक्सर्स संघासाठी खेळतो. सिडनी सिक्सरने विराट कोहली सोबत डील साइन केलेली पोस्ट शेअर केली. त्यानंतर काही तासानंतर सांगितले की ही एक चेष्ठा आहे. ही पोस्ट 1 एप्रिल रोजी करण्यात आली आहे, ज्याला एप्रिल फुल दिवस देखील म्हटले जाते.

बीसीसीआयच्या नियमानुसार विराट कोहली बिग बॅश‌ लीगमध्ये किंवा अन्य विदेशी स्पर्धेत खेळणं असंभव आहे. बीसीसीआय त्यांच्या खेळाडूंना बाहेरच्या स्पर्धेत खेळण्याची परवानगी देत नाही. हे नियम बनवण्याचे मुख्य कारण म्हणजे, ज्यामुळे इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेची लोकप्रियता टिकून राहील. विराट कोहली बद्दल बोलायचे झाल्यास आयपीएल 2025 मध्ये तो चांगल प्रदर्शन करत आहे, कोहलीने आतापर्यंत दोन सामन्यात 90 धावा केल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---