दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दर्जेदार संघांमध्ये समावेश होतो. मागील अनेक वर्षापासून दक्षिण आफ्रिकेने अनेक संस्मरणीय विजय आपल्या नावे नोंद केले आहेत. तसेच, दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना दिग्गजांचा दर्जा ही प्राप्त झालेला आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेला आजपर्यंत एकही विश्वचषक आपल्या नावे करता आला नाही. परंतु, सध्या संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या डेव्हिड मिलरने नव्या वर्षात हा दुष्काळ संपवण्याचा संकल्प केला आहे.
सध्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या मिलरने नुकतीच एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्याने आपल्या नव्या वर्षाच्या संकल्पाविषयी बोलले. तो म्हणाला,
“एक खेळाडू म्हणून तुम्ही नेहमीच सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी इच्छुक असता. या वर्षाकडून मला अनेक अपेक्षा आहेत. यावर्षी भारतात होणारा वनडे विश्वचषक जिंकणे हा माझ्या नव्या वर्षाच्या संकल्पापैकी एक आहे. आमच्या संघामध्ये ती क्षमता नक्कीच असून, आम्ही विश्वचषक उंचावू.”
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघ नेहमीच विश्वचषकात अपयशी ठरला आहे. त्यांना एकदाही विश्वचषकाच्या अंतिम फेरीत मजल मारता आली नाही. उपांत्य फेरीत संघाला पराभूत व्हावे लागत असल्याने त्यांना चोकर्स असे देखील संबोधले जाते.
डेव्हिड मिलर याने आयपीएल 2022 मध्ये शानदार कामगिरी करत गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. मिलरने यावर्षी 16 सामन्यात 142.73 च्या स्ट्राइक रेटने 481 धावा चोपलेल्या. तसेच भारत दौऱ्यावर देखील त्याची बॅट चांगलीच तळपली होती. विश्वचषकात मात्र त्याची कामगिरी संमिश्र राहिलेली. काही दिवसांमध्ये सुरू होत असलेल्या पहिल्या दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये मिलर पार्ल रॉयल्स संघाचे नेतृत्व करेल.
(Winning ODI World Cup Is My New Resolution David Miller Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! तब्बल 4 वर्षांनी केले कमबॅक, पण सामन्यापूर्वीच झाला कोरोना पॉझिटिव्ह; तरीही खेळतोय सामना
रिषभ पंतला झालेली लिगामेंटची दुखापत आहे तरी काय? लक्षणे आणि उपाय एका क्लिकवर घ्या जाणून