विस्डेन या क्रिकेटविश्वातील आघाडीच्या मासिकाने आयसीसीच्या क्रमवारीनुसार भारताचा इतिहासातील सर्वोत्तम संघ निवडला आहे. विशेष म्हणजे विराट कोहलीला या संघाचा कर्णधार म्हणून निवडले गेले आहे. या संघात सलामीवीर म्हणून सुनील गावसकर यांच्यासह राहुल द्रविडचा समावेश करण्यात आला आहे, तर स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागला या संघात स्थान मिळालेले नाही.
विस्डेनने इतिहासातील निवडलेल्या सर्वोत्तम भारतीय कसोटी संघामध्ये चेतेश्वर पुजारा आणि सचिन तेंडुलकर अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे. या संघाचा कर्णधार असलेला विराट कोहली पाचव्या स्थानावर आहेत. तर रिषभ पंतचा संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला असून माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संघात स्थान मिळालेले नाही.
या यादीत कपिल देव आणि रवींद्र जडेजा यांना अष्टपैलू म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर आर अश्विन आणि अनिल कुंबळे या दोन फिरकीपटूंचा समावेश करण्यात आलेला आहे. वेगवान गोलंदाज म्हणून या संघात जसप्रीत बुमराहचा समावेश करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असलेला जहीर खान देखील संघात स्थान मिळवू शकला नाही.
दरम्यान, भारतीय संघ आगामी काळात इंग्लंड दौर्यावर रवाना होणार आहे. भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर 18-22 जून दरम्यान साऊथॅम्प्टन येथे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळानार आहे. यानंतर भारतीय संघ ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांची बहुप्रतिक्षित मालिका खेळणार आहे. सर्व क्रिकेटप्रेमींना आशा असेल की, शानदार फॉर्ममध्ये असलेला भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना,तसेच इंग्लंड विरुद्धची मालिका जिंकत एक विशेष कामगिरी करेल.
विस्डेनचा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम कसोटी संघ – सुनील गावसकर,, राहुल द्रविड, चेतेश्वर पुजारा, सचिन तेंडुलकर, विराट कोहली (कर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), कपिल देव, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अनिल कुंबळे, जसप्रीत बुमराह.
महत्त्वाच्या बातम्या –
स्पर्धा स्थगितीचा सिलसिला सुरुच! कोरोनामुळे आयपीएलनंतर ‘ही’ मोठी टी२० लीग ढकलली पुढे
मोठी बातमी! दोन वेळचा ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला सागर धनखड हत्येप्रकरणी अखेर अटक
केवळ ५० रुपयांनी झाली ‘हिटमॅन’च्या क्रिकेट प्रशिक्षणाला सुरुवात; अशी आहे रोहितची संघर्षगाथा