2019 वर्षातील आता केवळ 2 दिवस शिल्लक आहेत. 2019 वर्षाबरोबरच हे दशकही संपेल. त्यामुळे अनेक दिग्गजांनी, क्रिकेटबोर्डांनी, वेबसाईट्सने, प्रकाशकांनी त्यांचे दशकातील सर्वोत्तम संघ जाहीर केले आहेत. यामध्ये विस्डेननेही दशकातील सर्वोत्तम वनेड आणि कसोटी संघापाठोपाठ आता 11 जणांच्या सर्वोत्तम टी20 संघाचीही घोषणा केली आहे.
या संघात विस्डेनने विविध संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना स्थान दिले आहे. मात्र या टी20 संघात भारताचा मर्यादीत षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला स्थान मिळालेले नाही. रोहित हा सध्या आंतरराष्ट्रीय टी20 मधील सर्वात यशस्वी सलामीवीर फलंदाज आहे.
तसेच तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये विराट कोहलीसह संयुक्तरित्या सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. या दोघांनीही आंतरराष्ट्रीय टी20मध्ये प्रत्येकी 2633 धावा केल्या आहेत. मात्र तरीही त्याला विस्डेनच्या सर्वोत्तम संघात निवडण्यात न आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले आहे.
त्याच्याबरोबरच भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीलाही या संघात निवडण्यात आलेले नाही. धोनी आंतरराष्ट्रीय टी20मधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने 41 टी20 सामन्यात कर्णधार म्हणून विजय मिळवला आहे.
विस्डेनच्या या दशकातील सर्वोत्तम टी20 संघात विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह या केवळ दोन भारतीय खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
याव्यतिरिक्त या संघात सलामीवीर म्हणून ऑस्ट्रेलियाचा मर्यादीत षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंच आणि न्यूझीलंडचा फलंदाज कॉलिन मुनरो यांना स्थान दिले आहे. तसेच फिंचला विस्डेनने या दशकातील सर्वोत्तम टी20 संघाचे कर्णधारपदही दिले आहे.
या संघात तिसऱ्या क्रमांकासाठी विस्डेनने भारताचा कर्णधार कोहलीची निवड केली आहे. विराट पाठोपाठ चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू शेन वॉटसनची निवड करण्यात आली आहे.
या संघात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल, इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉस बटलर यांनाही स्थान मिळाले आहे. तसेच अफगाणिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोहम्मद नबीला सातव्या क्रमांकासाठी जागा मिळाली आहे.
त्यानंतर डेव्हिड विली, राशिद खान, जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा यांना या टी20 संघात गोलंदाज म्हणून स्थान मिळाले आहे.
असा आहे विस्डेनचा या दशकातील सर्वोत्तम टी20 संघ-
ऍरॉन फिंच (कर्णधार), कॉलिन मुनरो, विराट कोहली, शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल, जॉस बटलर (यष्टीरक्षक), मोहम्मद नबी, डेव्हिड विली, राशिद खान, जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा.
तो दिवस ना धोनी विसरला, ना धोनीचे चाहते
वाचा????https://t.co/LivOyJwuzj????#म #मराठी #Cricket #MSDhoni @msdhoni— Maha Sports (@Maha_Sports) December 30, 2019
टीम कोहलीचं टेन्शन वाढलं, हा खेळाडू वाढवणार संघाचं टेन्शन
वाचा????https://t.co/uxXKUxZCcB????#म #मराठी #Cricket #TeamIndia @ShortDarcy— Maha Sports (@Maha_Sports) December 30, 2019