पुणे (15 मार्च 2024)- के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आज पहिली लढत सांगली विरुद्ध सातारा या संघात झाली. सांगली संघ 2 विजयासह तिसऱ्या स्थानी होता. तर सातारा संघ 3 पराभवसह सातव्या सथान वर होता. सांगली संघाने जोरदार सुरुवात केली होती. चढाईटपटू अभिराज पवार व तुषार खडके यांनी चतुरस्त्र चढाया करत गुण मिळवले.
सांगली संघाने सामन्याच्या 9 व्या मिनिटाला सातारा संघाला ऑल आऊट 13-05 अशी आघाडी मिळवली. मध्यंतरा पूर्वी आणखी एकदा ऑल आऊट आघाडी वाढवली. सांगली ने मध्यंतरापूर्वी 28-12 अशी आघाडी मिळवली होती. मध्यंतरा नंतरही सांगली ने आपला आक्रमक खेळ सुरू ठेवत सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. तुषार खडके व अभिराज पवार ने सुपर टेन पूर्ण केला.
संपूर्ण सामन्यात सांगली संघाने सातारा संघाला 4 वेळा ऑल आऊट केले. सांगली ने 56-27 असा एकतर्फी सामना जिंकला. विजयासह सांगली संघाने गुणतालिकेत पहिल्या स्थानावर झेप घेतली. सांगली कडून अभिराज पवार ने चढाईत सर्वाधिक 15 गुण मिळवले. तर पकडीत 1 गुण मिळवला. तुषार खडके ने चढाईत 15 गुण मिळवले. नवाज देसाई पकडीत 5 गुण मिळवत हाय फाय पूर्ण केला. प्रणव माने ने 3 पकडी केल्या. सातारा कडून कुणाल जाधव ने सर्वाधिक 12 गुण मिळवले. तसेच प्रणव धुमाळ ने 5 पकडी केल्या. (With the third win, Sangli jumped to the top spot)
बेस्ट रेडर- तुषार खडके, सांगली
बेस्ट डिफेंडर- नवाज देसाई, सांगली
कबड्डी का कमाल – कुणाल जाधव
महत्वाच्या बातम्या –
‘असं क्रिकेट खेळू की…’, आयपीएल 2024 पूर्वी मुंबई कॅप्टन हार्दिक पंड्या काय म्हणाला?
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! टी 20 विश्वचषकातील भारत-पाक सामन्यासाठी राखीव दिवस जाहीर