त्रिनिदादमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात आमने-सामने आले आहेत. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 4 विकेट्स गमावत 288 धावा केल्या होत्या. पहिल्या दिवशी विराट कोहली 87 धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी त्याने लवकरच आपल्या शतकाला गवसणी घातली. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 29 वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 76 वे शतक ठरले.
या कसोटीच्या पहिल्या दिवशी विराट 87 धावांवर नाबाद खेळत होता. दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यानंतर त्याने सावध सुरुवात केली. मात्र, संधी मिळाल्यानंतर त्याने चौकार वसूल करत 90 च्या पुढे मजल मारली. तर, शतकासाठी तीन धावांची आवश्यकता असताना त्याने चौकार ठोकत आपल्या कसोटी कारकिर्दीतील 29 वे शतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे 76 वे शतक आहे.
विराट आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 500 वा सामना खेळत आहे. यापूर्वी जगभरातील दहा क्रिकेटपटूंनी पाचशे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यापैकी या खास सामन्यात शतक करणारा विराट पहिला फलंदाज बनला. विराटच्या नावे कसोटीत 29, वनडे क्रिकेटमध्ये 45 व टी20 मध्ये 1 शतक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या शंभर शतकानंतर विराटच्या नावे सर्वाधिक शतके आहेत. तसेच सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंमध्ये देखील विराटच अव्वल दिसून येतो.
(WIvIND Virat Kohli Hits 29 th Test Century 76 In International)
महत्वाच्या बातम्या –
सलामीवीर बनताच रोहितची कारकीर्द गेली टॉपवर! एकदा आकडेवारी पाहूनच घ्या
WI vs IND । ‘हे’ आहे शार्दुलला बाहेर बसवण्याचं कारण, समोर आली महत्वाची माहिती