भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली याला जगातील सर्वात फिट क्रिकेटपटूमध्ये गणले जाते. मागच्या मोठ्या काळापासून विराट आपल्या फिटनेसमध्ये दिवसेंदिवस सुधारणा करत आहे. त्याने आपले आवडेत पदार्थही खायचे सोडले आहेत. वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी विराट कोहलीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात तो जीममध्ये घाम गाळत आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात संघाला एकून 10 सामने खेळायचे आहेत. दोन सामन्यांची कसोटी मालिका सध्या खेळली जात आहे. यानंतर उभय संघात तीन वनडे सामन्यांची, तर पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळायची आहे. कसोटी मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी (20 जुलै) सुरू त्रिनिदादमध्ये सुरू होईल. त्याआधी विराट कोहली (Virat Kohli) जीममध्ये मेहनत घेताना दिसला. त्याने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत विराट क्सॉट्स मारताना दिसत आहे आणि कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, “स्ट्रेंथ वाढवण्यासाठी मी सर्वात जास्त हाच व्यायाम करतो.”
https://www.instagram.com/reel/Cuzhz2pAu-0/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान, उभय संघांतील दुसरा कसोटी सामना 20 जुलै रोजी सुरू झाल्यानंतर 24 जुलै रोजी संपेल. त्यानंतर 27 जुलै ते 1 ऑगस्ट यादरम्यान तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल. टी-20 मालिकेची सुरुवात 3 ऑगस्ट रोजी होणार असून मालिकेतील शेवटचा सामना 13 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने 182 चेंडूत 76 धावांची खेळी केली होती. भारतीय संघ या मालिकेतील 0-1 अशा आघाडीवर आहे. अशात दुसऱ्या कसोटीत जर भारताने विजय मिळवला, तर वेस्ट इंडीजला व्हाईट वॉश मिळेल. भारताने हा सामना अनिर्णीत केला तर तरीही वेस्ट इंडीजच्या हातून मालिका जाणार आहे. पण भारतीय संघ पराभूत झाला, तरच मालिका बरोबरीवर सुटेल. अशात शेवटच्या कसोटीत संघासाठी शतक करून विजय मिळवण्याचा प्रयत्न विराट कोहलीचा असेल. त्याच पार्श्वभूमीवर विराटने सरावाला सुरुवात केल्याचे दिसते. (WIvsIND । Virat’s sweat came out while hitting Scots before the second Test! Watch the video)
महत्वाच्या बातम्या –
‘आता कुणाशीच काही शेअर करत नाही…’, टीम इंडियातून बाहेर असलेला शॉ भावूक
लहान वयातच अनेकांसाठी आदर्श ठरलेली ‘सांगलीकर’ स्मृती मंधाना