fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू जेनसन ऑस्ट्रेलियाई गर्लफ्रेंडबरोबर अडकली विवाहबंधनात

न्यूझीलंड महिला संघाची क्रिकेटपटू हेली जेनसन आणि ऑस्ट्रेलियाची क्रिकेटपटू निकोला हेनकॉक विवाहबंधनात अडकले आहेत. मागील आठवड्यात हा विवाहसोहळा पार पडला.

23 वर्षीय हेनकॉक ही 26 वर्षीय जेनसनची मेलबर्न स्टार्स संघातील माजी संघसहकारी आहे. या दोघींच्या विवाहाबद्दल मेलबर्न स्टार्सच्या ट्विटर हँडलवर माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

बिगबॅश महिला लीगमध्ये सुरुवातीच्या दोन मोसमात या दोघीही एकत्र खेळल्या आहेत. पण तिसऱ्या मोसमात जेनसेन ही मेलबर्न रेनेगेड्स संघाकडून खेळली. तसेच हेनकॉक मेलबर्न स्टार्सकडूनच खेळली.

अष्टपैलू असणाऱ्या जेनसेनने न्यूझीलंडकडून 2014 मध्ये विंडीजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तसेच हेनकॉकने बीगबॅश लीगमध्ये मागील मोसमात 14 सामन्यात 13 विकेट्स घेत सर्वांना प्रभावित केले होते.

न्यूझीलंडमध्ये सहा वर्षांपूर्वी एप्रिल 2013 मध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीरपणे मान्यता दिली आहे.

जेनसन आणि हेनकॉकच्या आधी मार्च 2017 मध्ये एमी सदरवेट आणि ली तहुहु या न्यूझीलंड महिला संघाच्या क्रिकेटपटू विवाहबंधनात अडकल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

हार्दिक पंड्याचा हॅलिकॉप्टर शॉट पाहुन त्याला असे म्हणाला एमएस धोनी…

शास्त्रींच्या मते भारत नाही तर हा संघ आहे विश्वचषक विजेतपदासाठी प्रबळ दावेदार…

हा खेळाडू विश्वचषकासाठी संघात असल्याने कर्णधार कोहली आहे खूश

You might also like