सोमवारी (दि. 13 फेब्रुवारी) मुंबई येथे महिला प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेचा लिलाव पार पडला. यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी मंगळवारी बीसीसीआयने महिला प्रीमिअर लीगच्या पहिल्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही स्पर्धा येत्या 4 मार्च पासून सुरू होणार असून 26 मार्च रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. या स्पर्धेत एकूण 5 संघांमध्ये 22 सामने खेळले जातील. स्पर्धेतील सर्व सामने मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडिअम आणि ब्रेबॉर्न स्टेडिअम या दोन मैदानांवर खेळले जातील. दोन्ही मैदानांवर प्रत्येकी 11 सामने खेळले जाणार आहेत.
या स्पर्धेतील पहिला सामना 4 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स (Mumbai Indians vs Gujarat Titans) संघात खेळला जाईल. हा सामना डी. वाय. पाटील स्टेडिअमवर पार पडेल. या स्पर्धेत सर्व संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी 2 सामने खेळतील.
🚨 NEWS 🚨: BCCI announces schedule for Women’s Premier League 2023. #WPL
More Details 🔽https://t.co/n92qVFwu1x
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 14, 2023
किती वाजता सुरू होतील सामने?
महिला प्रीमिअर लीग 2023 (Womens Premier League 2023) स्पर्धेतील सामन्यांची सुरुवात 3.30 आणि 7.30 वाजता खेळले जातील. डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) 5 मार्च रोजी होईल. दिवसातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होईल. तसेच, दुसरा सामना यूपी वॉरिअर्स विरुद्ध गुजरात जायंट्स संघात खेळला जाईल. स्पर्धेत एकूण 4 डबल हेडर सामने खेळले जातील.
एलिमिनेटर आणि अंतिम सामना
एकूण 23 दिवसात साखळी फेरीतील 20 सामने खेळले जातील. स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना 21 मार्च रोजी यूपी वॉरिअर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळला जाईल. याव्यतिरिक्त एक एलिमिनेटर आणि अंतिम सामना खेळला जाईल. एलिमिनेटर सामने 24 मार्च रोजी डी. वाय. पाटील स्टेडिअममध्ये होईल, तर स्पर्धेचा अंतिम सामना 26 मार्च रोजी ब्रेबॉर्न स्टेडिअमवर पार पडेल.
स्पर्धेतील एकूण पाच संघ
स्पर्धेत एकूण 5 संघ आहेत. त्यामध्ये मुंबई इंडियन्स, यूपी वॉरिअर्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि गुजरात जायंट्स यांचा समावेश आहे.
एकूण 87 खेळाडूंवर लागली बोली
महिला प्रीमिअर लीगसाठी 13 फेब्रुवारी रोजी लिलाव पार पडला होता. यामध्ये एकूण 87 खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती. बेंगलोर संघाने 3.40 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावत भारतीय संघाची उपकर्णधार स्म्रीती मंधाना (Smriti Mandhana) हिला आपल्या ताफ्यात सामील केले होते. तसेच, मुंबई इंडियन्स संघाने अष्टपैलू नॅट सायव्हर हिला 3.20 कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतले. (womens premier league 2023 full schedule venue timing mumbai indians vs gujarat giants first match read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! भारतीय वाघ दुखापतीतून सावरला, दिल्ली काबीज करण्यासाठी श्रेयस अय्यरचे टीम इंडियात पुनरागमन
लेक असावी तर अशी! WPL लिलावात 19व्या वर्षी ऋचा बनली कोट्याधीश; आई-वडिलांसाठी करणार ‘हे’ मोठे काम