महिला प्रीमियर लीग (WPL) 2024 च्या चॅम्पियनचा निर्णय आज (17 मार्च) होणार आहे. WPL च्या दुसऱ्या हंगामाचा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला जाईल. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दोन्ही संघांची लढत होणार आहे.
डीसीनं सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना गेल्या हंगामाच्या अंतिम फेरीत मुंबई इंडियन्सकडून पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. मुंबईचा संघ यावेळी एलिमिनेटर मधून बाहेर पडला. आरसीबीनं त्यांचा पराभव केला.
गेल्या मोसमात आरसीबीची कामगिरी चांगली नव्हती. संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नाही. मात्र स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबी या हंगामात एका वेगळ्या फार्मात दिसली. त्यांनी यावर्षी प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. आता महिला प्रीमियर लीगच्या विजेत्या आणि उपविजेत्याला किती रक्कम मिळते हे आम्ही तुम्हाला सांगतो.
मुंबई इंडियन्सला WPL 2023 चं विजेतेपद जिंकण्यासाठी 6 कोटी रुपये मिळाले होते. तर उपविजेत्या दिल्लीला 3 कोटी रुपये देण्यात आले होते. बीसीबीआयनं यंदा बक्षीस रकमेत कोणताही बदल केलेला नाही. अशा परिस्थितीत WPL 2024 च्या चॅम्पियनला 6 कोटी रुपये आणि उपविजेत्याला 3 कोटी रुपये मिळतील. तर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेत्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जातील.
ऑरेंज कॅपच्या दावेदारांच्या यादीत एलिस पेरी (312 धावा), मेग लॅनिंग (308 धावा) आणि स्मृती मानधना (269 धावा) यांचा समावेश आहे. लॅनिंग ही दिल्लीची कर्णधार आहे. पर्पल कॅपच्या दावेदारांच्या यादीत मॅरिजेन कप्प (11 विकेट), जेस जोनासेन (11 विकेट) आणि आशा शोभना (10) यांचा समावेश आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघ : मेग लॅनिंग (कर्णधार), तानिया भाटिया (विकेटकीपर), शफाली वर्मा, ॲलिस कॅप्सी, जेस जोनासेन, राधा यादव, अरुंधती रेड्डी, ॲनाबेल सदरलँड, लॉरा हॅरिस, पूनम यादव, शिखा पांडे, मिन्नू मणी, जेमिमा रॉड्रिग्स, मारिजेन कप्प, अश्विनी कुमारी, अपर्णा मंडल, तितास साधू, स्नेहा दीप्ती.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ : स्मृती मानधना (कर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), सोफी डिव्हाईन, जॉर्जिया वॅरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, श्रद्धा पोखरकर, रेणुका ठाकूर सिंग, सिमरन बहादूर, इंद्राणी रॉय, शुभा सतीश, सब्बिनेनी मेघ, नानानेनी लिपिक, केट क्रॉस, एकता बिश्त, एलिस पेरी, दिशा कसाट, सोफी मोलिनक्स.
महत्त्वाच्या बातम्या-
पुरुष संघाशी तुलना नको! WPL फायनलआधी ‘हे’ काय बोलून गेली आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना
आयर्लंडच्या फलंदाजाचा टी20 क्रिकेटमध्ये विश्वविक्रम, ‘असं’ करणारा ठरला जगातील पहिला खेळाडू