वर्तमान बीसीसीआय अध्यक्ष व भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना काही दिवसांपूर्वीच हृदयातील समस्या मुळे हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. गांगुली यांना शनिवारी छातीमध्ये वेदना जाणवू लागल्या असता त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. मात्र आता बातमी समोर येत आहे की गांगुली यांची प्रकृती स्थिर असून त्यांना बुधवारी हॉस्पिटल मधून सुट्टी देखील मिळू शकते.
सौरव गांगुली सध्या उपचार घेत असलेल्या वुडलेंड्स हॉस्पिटलच्या एमडी रूपाली बसु यांनी माहिती दिली की, हॉस्पिटलमधील 9 वरिष्ठ डॉक्टरांच्या समितीने गांगुली यांच्या प्रकृती बद्दल चर्चा केली. चर्चेनंतर निर्णय घेण्यात आला की गांगुली यांची प्रकृती स्थिर असल्याने एंजियोप्लास्टीला काही काळ पुढे ढकलण्यात यावे. गांगुली यांना हॉस्पिटलमध्ये भरती केल्यानंतर पहिल्या काही तासातच त्यांची एक एंजियोप्लास्टी केली गेली होती.
बासू यांनी स्पष्ट केले की प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. देवी शेट्टी आणि डॉ. आर. के. पांडा देखील ऑनलाइन माध्यमातून चर्चेत भाग घेत आहेत. तसेच गांगुली यांच्या प्रकृतीबद्दल अमेरिकेतील एका तज्ञ डॉक्टरांचेही मार्गदर्शन घेतले जात आहे.
भविष्यात होणाऱ्या एंजियोप्लास्टी बद्दल डॉ. बासू म्हणाल्या, “एंजियोप्लास्टी काही कालावधीत करावीच लागणार आहे. त्यांना साधारणतः परवापर्यंत ( बुधवार) हॉस्पिटल मधून सुट्टी मिळू शकते.”
यादरम्यानच केंद्रीयमंत्री अनुराग ठाकूर देखील गांगुलींची भेट घेण्यासाठी आले होते. यादरम्यान अनुराग ठाकूर म्हणाले की गांगुली हे देशाचे नायक असून त्यांनी आपल्या करिअरमध्ये विरोधकांना प्रत्येक वेळी मात दिलेली आहे. यावेळी देखील ते आजाराला मात देऊन लवकरात लवकर बरे होतील.
महत्वाच्या बातम्या:
व्हिडिओ : जेमिसनने चाहत्याच्या टक्कलवर दिला ऑटोग्राफ, मग काय चाहत्याने पूर्ण लूकच बदलला
नादच खुळा! पाकिस्तानविरुद्ध विलियम्सनचं कसोटी कारकिर्दीतील चौथे द्विशतक, १४ दिग्गजांना टाकले मागे
अजबच! झेल घ्यायचा सोडून या खेळाडूने केले डोळे बंद, पाहा व्हिडिओ