---Advertisement---

ऑस्ट्रेलियाच्या विक्रमी विजयानंतर कमिन्सचे मोठे विधान; म्हणाला, ‘आम्ही आमची क्षमता…’

Pat-Cummins
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघ वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेत आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला आहे. बुधवारी (दि. 25 ऑक्टोबर) विश्वचषकाच्या 24व्या सामन्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सविरुद्ध तब्बल 309 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर कर्णधार पॅट कमिन्स खूपच खुश झाला. त्याने विक्रमी शतकवीर ग्लेन मॅक्सवेल याच्यावर स्तुतीसुमनेही उधळली.

झाले असे की, या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) याने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी त्यांनी प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 विकेट्स गमावत 399 धावा चोपल्या. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून डेविड वॉर्नर (David Warner) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) यांनी शतक केले. वॉर्नरने 93 चेंडूत 104 धावा, तर मॅक्सवेलने 44 चेंडूत 106 धावा केल्या. या दोघांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सला 400 धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्स संघाचा डाव 21 षटकात अवघ्या 90 धावांवर संपुष्टात आला. अशाप्रकारे विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवण्यात ऑस्ट्रेलिया यशस्वी झाला. या विजयात अनेक खेळाडूंचे योगदान होते. त्यात सिंहाचा वाटा मॅक्सवेलने उचलला. त्याने 40 चेंडूत शतक ठोकत विश्वचषकात वेगवान शतक करण्याचा विक्रम केला. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

या सामन्यात ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर पॅट कमिन्स याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने सामन्यानंतर काय म्हटले, चला जाणून घेऊयात…

काय म्हणाला कमिन्स?
पॅट कमिन्स म्हणाला, “मी या ऐतिहासिक विजयाने खूपच खुश झालो आहे. आम्ही आमची क्षमता दाखवून खेळायला सुरू केले आहे. पुन्हा एकदा आमच्या फलंदाजांनी कमाल प्रदर्शन केले. ग्लेन मॅक्सवेलने जबरदस्त खेळी केली. 400 धावांचे आव्हान देणे आणि त्याचा चांगल्याप्रकारे बचाव करणे, यापेक्षा जास्त आनंदाची बाब नसू शकते.” मॅक्सवेलविषयी बोलताना तो हसत म्हणाला की, “मला वाटते, आम्ही दोघांनी त्या शतकीय भागीदारीत समान योगदान दिले आहे.”

तो असेही म्हणाला की, “आता आमचा पुढील सामना न्यूझीलंडशी होणार आहे, जो चांगला संघ आहे. ते धरमशाला येथे पोहोचले आहेत. मात्र, आम्ही आमच्या चुका सुधारून या सामन्यात शानदार प्रदर्शन करू. आम्हाला या सामन्याची खूपच प्रतीक्षा आहे. तसेच, आम्ही चांगल्या लयीत आहोत आणि ऍडम झम्पानेही चार विकेट्स घेत महत्त्वाचे योगदान दिले आहे.”

ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड संघातील सामन्याविषयी बोलायचं झालं, तर हा सामना 28 ऑक्टोबर रोजी धरमशाला येथे खेळला जाणार आहे. हा विश्वचषक 2023 स्पर्धेतील 27वा सामना असणार आहे. (world cup 2023 aus vs ned pat cummins statement after winning match against netherlands said this read)

हेही वाचा-
Big News: भारतीय महिला संघाला मिळाला मुख्य प्रशिक्षक, देशांतर्गत क्रिकेटमध्ये पाडलाय 33 शतकांचा पाऊस
पंड्याच्या दुखापतीविषयी धक्कादायक बातमी! एक-दोन नाही, तर ‘एवढ्या’ सामन्यांना मुकण्याची शक्यता

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---