fbpx
Saturday, January 23, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फक्त इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलेल्या क्रिकेटर्सची खास प्लेअिंग ११

September 15, 2020
in टॉप बातम्या, क्रिकेट
0

आज अभियंता दिवस. असं म्हणतात की इंजीनिअरने प्रोफेशन बदललं की काहीतरी मोठं होणार असतं. अशाच काहीतरी वेगळा मार्ग निवडलेल्या (अर्थात तो मार्ग क्रिकेटचा आहे. ) काही इंजीनिअर अवलियांबद्दल…

इंजीनिअरींगची पदवी घेतलेल्या अनेक खेळाडूंनी भारतीय क्रिकेट संघाकडून कारकिर्द घडवली आहे. ही कारकिर्द अवघड असण्याचं कारण म्हणजे इंजीनिअरींगच्या पदवीला लागणारा ४ वर्षांचा वेळ व त्याचबरोबर क्रिकेट कारकिर्द सांभाळणं

जगातील अनेक चांगल्या क्रिकेटरची आंतरराष्ट्रीय कारकिर्द वयाच्या १७-१८ला सुरु झालेली असताना इंजीनिअरला २०-२१ वयापर्यंत शिक्षण घ्यावे लागते. अर्थात अनेकांनी तेव्हा प्रथम श्रेणी क्रिकेटचाही श्रीगणेशा केलेला नसतो. त्यात ८ सेमीस्टरमध्ये जवळपास ४०हुन अधिक विषय आणि २४-२५ प्रात्यक्षिकांचे विषय करुन जर कुणी क्रिकेटमध्ये उत्तम कारकिर्द करत असेल तर त्याला सलामच करावा.

तुम्हाला काॅलेज आणि क्रिकेटची सांगड घालून सराव, देशांतर्गत सामने, क्लब क्रिकेट सगळंच मॅनेज करावं लागतं. शिवाय चांगली नोकरी लागण्याची शक्यता असताना तुम्ही क्रिकेटमधील सुरुवातीचा काही काळ स्ट्रगलसाठी तयार असता. त्यामुळे इंजीनिअर हे एक वेगळंच रसायन क्रिकेटच्या क्षेत्रात पहायला मिळतं.

भारताकडून अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, आर अश्विन, के श्रीकांत, श्रीनिवास वेंकटराघवन आणि इरापल्ली प्रसन्नासारख्या दिग्गजांची इंजीनिअरींगची पदवी तर घेतलीच शिवाय क्रिकेटमध्ये उत्तम कारकिर्दही घडवली. यातील के श्रीकांत सोडले तर बाकी सर्वजण गोलंदाज. असं म्हणतात की गोलंदाजीची कारकिर्द फलंदाजाच्या तुलनेत लवकर सुरु होते आणि लवकर संपते. असं असताना यातील अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ किंवा अश्विनने मात्र शिक्षणाबरोबर क्रिकेट कारकिर्दीत केलेला कारनामा अफलातून आहे.

आश्विनची प्रथम श्रेणी कारकिर्द २०व्या तर आंतरराष्ट्रीय कारकिर्द २४व्या वर्षी सुरु झाली. जवागल श्रीनाथची प्रथम श्रेणी कारकिर्दही २०व्या तर आंतरराष्ट्रीय कारकिर्द २३व्या वर्षी सुरु झाली. कुंबळेचे आंतरराष्ट्रीय पदार्पण मात्र २०वयाच्या आतच झाले. ही सर्व वयाची आकडेवारी पाहिली तर या खेळाडूंनी आपलं शिक्षण पुर्ण करताना काय काय केलं असेल याचा विचारच न केलेला बरा.

एक इंजीनिअर काय काय करु शकतो याच उत्तम उदाहरण म्हणजे श्रीनिवास वेंकटराघवन. पहिल्या दोन विश्वचषकात त्यांनी भारतीय संघाचं नेतृत्त्व तर केलंच शिवाय पुढे संघ व्यवस्थापक, आंतरराष्ट्रीय पंच, सामनाधिकारी अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. हे करताना त्यांनी इंजीनिअरिंगमध्ये ज्या कशाचा अभ्यास केला असेल त्याचा नक्कीच उपयोग त्यांना कारकिर्दीत एका क्षेत्रातून दुसरीकडे स्विच होताना झाला असणार.

विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम इंजीनिअर असलेल्या अनिल कुंबळेच्या नावावर आहे. त्याने बेंगलोरच्या इलेक्ट्राॅनिक्स सिटीमध्ये इंजीनिअर म्हणून नोकरीला प्राधान्य न देता भारताकडून ४०३ सामने खेळताना ९५६ विकेट्स घेत हा कारनामा केला आहे.

असा होऊ शकतो इंजिनियर्सचा ११ जणांचा संघ-
सईद अन्वर (कम्युटर), के श्रीकांत (इलेक्ट्रिकल), सुजीत सोमासुंदर (कम्युटर), राशिद लतिफ (कम्युटर), सर्फराज अहमद (इलेक्ट्राॅनिक्स, यष्टीरक्षक), आर अश्विन (आयटी), अनिल कुंबळे (मेकॅनिकल, कर्णधार), इरापल्ली प्रसन्ना, जवागल श्रीनाथ (इंस्ट्रुमेटशन) , रजनीश गुरबानी (सिव्हील) आणि आर वेंकटराघवन

महत्त्वाचे लेख
–असे शिक्षण टीम इंडियात कुणी घेतले नाही, एक आहे पीएचडी तर दुसरा…
–जबरदस्त क्रिकेट खेळलेले व इंजिनीअरिंगच शिक्षण घेतलेले ११ क्रिकेटर्स
–पहा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने घेतले आहे किती शिक्षण ?
–शिक्षणासाठी सोडलं होत क्रिकेट, आज ठरला सर्वात महागडा खेळाडू
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.


Previous Post

स्वतः गोलंदाजानेच केले कबूल; ‘विराट जेव्हा मला पाहिल, तेव्हा माझी गोलंदाजी…’

Next Post

विश्वचषकात पराभूत झालेल्या न्यूझीलंड संघावर असा विश्वास पुर्वी कुणी दाखवला नसेल…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला करा कसोटी संघाचा कर्णधार, इंग्लंडच्या दिग्गजाची मागणी

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/BBL
क्रिकेट

दिल्ली संघाने रिलीज केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी झळकावले ‘त्याने’ शानदार शतक

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC and WWE
क्रिकेट

ट्रिपल एच म्हणतोय, ‘…तर मी असतो दुसरा सचिन तेंडुलकर’

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ ICC
क्रिकेट

दुसऱ्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजचा धुव्वा उडवत बांगलादेशची मालिकेत विजयी आघाडी

January 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
क्रिकेट

ठरलं! आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचा लिलाव ‘या’ तारखेला होणार 

January 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ BCCI
क्रिकेट

कोणतेही सत्य न तपासता कसे काय आरोप करतो? चाहत्यांच्या रोषानंतर हरभजन सिंगला मागावी लागली माफी

January 22, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ ICC

विश्वचषकात पराभूत झालेल्या न्यूझीलंड संघावर असा विश्वास पुर्वी कुणी दाखवला नसेल...

वयाची तिशी पुर्ण केलेला मुंबईकर लढतोय टीम इंडियाकडून एक सामना खेळण्यासाठी

पंजाबी मुंडा शिखर धवन शिकवतोय लाजाळू अजिंक्य रहाणेला भांगडा, पहा व्हिडीओ...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.