गेल्या काही वर्षांपासून भारताचा कर्णधार विराट कोहली जोरदार कामगिरी करत आहे. तो शतकांवर शतके मारत धावांचा ढीग रचत आहे. त्यामुळे त्याची क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांमध्ये गणना केली जाते. तर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर हा क्रिकेटविश्वातील दिग्गज फलंदाज आहे, ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० शतके केली आहेत. शिवाय, कसोटी आणि वनडे क्रिकेटमध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या आहेत.
मात्र, एक असाही फलंदाज आहे, ज्याच्या नावावर क्रिकेटमधील सर्वाधिक धावांची नोंद आहे. या महान फलंदाजाने एकूण ६१,७६० धावा केल्या आहेत. यात त्यांच्या १९९ शतकांचा समावेश आहे. असा अनोखा आणि जबरदस्त विक्रम करणाऱ्या क्रिकेटपटूचे नाव ‘जॅक हॉब्स’ आहे. त्यांनी इतक्या जास्त धावा आणि शतके आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्हे तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केल्या होत्या.
चला तर जाऊन घेऊयात, कोण होते हे जॅक हॉब्स… (Worlds Greatest Batsman With 61760 Runs And 199 Centuries)
इंग्लंड क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू जॅक हॉब्स ज्यांचा जन्म १६ डिसेंबर १८८२ला कॅम्ब्रिज येथे झाला होता. वयाच्या २३व्या वर्षी म्हणजे १९०५ला हॉब्स यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर लगेच ३ वर्षांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यातून त्यांना इंग्लंड कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. यावेळी, पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावातच त्यांनी ८३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर, १९११-१२ मध्ये हॉब्स यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ शतके ठोकली. त्यांच्या त्या दमदार प्रदर्शनानंतर त्यांना क्रिकेटविश्वातील सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हटले जाऊ लागले.
‘द मास्टर’ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या हॉब्स यांनी इंग्लंडकडून ६१ कसोटी सामन्यातील १०२ डावांत ५६.९४च्या सरासरीने ५४१० धावा केल्या होत्या. यात त्यांच्या १५ शतकांचा आणि २८ अर्धशतकांचा समावेश होता. ते कसोटीमध्ये ५००० धावा करणारे पहिले फलंदाज होते.
परंतु, हॉब्स यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा प्रथम श्रेणीमध्ये अफलातून कामगिरी केली होती. त्यांनी ८३४ प्रथम श्रेणी सामने खेळले होते. त्यामध्ये त्यांनी ५०.७०च्या सरासरीने ६१,७६० धावा केल्या होत्या. यात त्यांच्या १९९ शतकांसह २७३ अर्धशतकांचाही समावेश होता. तर, त्यांचा सर्वाधिक स्कोर हा नाबाद ३१६ धावा इतका होता. हॉब्स यांचा हा विक्रम मोडणे अशक्य आहे.
#OnThisDay in 1908, the great Jack Hobbs made his Test debut for England at the MCG. The highest scorer in first-class cricket, he was the first batsman to reach 5,000 Test runs. pic.twitter.com/vV4aHSugIq
— ICC (@ICC) January 1, 2018
हॉब्स यांना हा कधीही न तुटणारा विक्रम करण्यासाठी २९ वर्षे मेहनत करावी लागली. १९०५ पासून ते १९३४ पर्यंत त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आणि तब्ब्ल ८३४ सामने खेळण्याचा कारनामा केला. इतके जास्त सामने खेळणारे ते जगातील दूसरे फलंदाज आहेत. त्यांच्यापेक्षा जास्त सामने खेळणारे क्रिकेटपटू फ्रँक वूली हे आहेत. त्यांनी तब्बल ९७८ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत.
जर, हॉब्स यांची आकडेवारी पाहिली तर त्यांनी २९ वर्षांमध्ये दरवर्षी २८ सामने खेळले. म्हणजे त्यांनी एका महिन्यात जवळपास २ सामने खेळले आणि एक प्रथम श्रेणी सामना ५ दिवस चालतो, म्हणजे हॉब्स यांनी २९ वर्षे जवळपास एक दिवसाआड एक सामने खेळले होते. फलंदाजीसोबतच हॉब्स हे क्षेत्ररक्षणातही माहीर होते. त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जवळपास ३४२ झेल पकडले होते.
असा हा महान क्रिकेटपटू वयाच्या ८१व्या वर्षी जग सोडून गेला.
महत्त्वाच्या बातम्या –
हा क्रिकेटर तर चुकून झाला राष्ट्रीय संघाचा कोच, नाहीतर मोहम्मद युसूफच होता लायक
कोरोनाने घेतले सोलापूरच्या क्रिकेटरचे प्राण, गेल्या २ आठवड्यांपासून चालू होते उपचार
क्रिकेटवेड्या देशाला फुटबॉलची भुरळ पाडणारा सुनील छेत्री
ट्रेंडिंग लेख –
आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ५ बहीण-भावांच्या जोड्या…
वनडे क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक चेंडू खेळणारे टॉप ५ फलंदाज….
एकाच वनडे सामन्यात सलामीला फलंदाजी आणि गोलंदाजी करणारे ५ भारतीय खेळाडू…