वुमेन्स प्रिमियर लीगच्या पहिल्या हंगामाचे विजेतेपद मुंबई इंडियन्सने आपल्या नावे केले. रविवारी (26 मार्च) ब्रेबॉर्न स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 7 विकेट्सने पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली. एकीकडे मुंबईच्या विजयाचा आनंद साजरा होत असतानाच, मुंबईच्या या विजयाला वादाची किनार लाभली आहे. अंतिम सामन्यात दिल्लीची आक्रमक सलामीवीर शफाली वर्मा हिला बाद देण्याचा निर्णय काहीसा होताना दिसतोय.
6⃣,4⃣ and OUT!
Talk about a dramatic start in the #Final ????????
Follow the match ▶️ https://t.co/N0U4wKUU0z#TATAWPL | #DCvMI pic.twitter.com/iMLHWvmJMW
— Women's Premier League (WPL) (@wplt20) March 26, 2023
पहिल्या विजेतेपदासाठी आतुर असलेल्या दोन्ही संघातील हा सामना चांगलाच रंगण्याची शक्यता होती. प्रथम फलंदाजी करत असलेल्या दिल्लीला पहिल्या षटकात केवळ दोन धावा करता आल्या. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर शफाली वर्माने षटकार व दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. तिसरा चेंडूवर तीने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. फुलटॉस पद्धतीचा आलेला हा चेंडू व्यवस्थित तिच्या बॅटवर आला नाही व ती पॉईंटच्या दिशेला झेलबाद झाली. मात्र, हा चेंडू कमरेच्यावर असल्याचे अपील करून तिने नो बॉलसाठी तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली. मात्र, त्यांनी हा चेंडू वैध ठरवत शफालीला बाद दिले. त्यावर ती प्रचंड नाराज झालेली दिसली. सोशल मीडियावर देखील अनेकांनी हा चेंडू नो बॉल असल्याचेच म्हटले.
अंतिम सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, दिल्लीला या सामन्यात सुरुवातीपासूनच अडचणींचा सामना करावा लागला. मुंबईने सुरुवातीलाच घातक गोलंदाजी करत दिल्लीची अवस्था खराब केली होती. 79 धावांवर दिल्लीने आपल्या 9 विकेट्स गमावलेल्या. मात्र, शिखा पांडे व राधा यादव यांनी नाबाद भागीदारी करत दिल्लीला 131 पर्यंत मजल मारून दिले. त्यानंतर मुंबईला देखील या धावांसाठी संघर्ष करावा लागला. नॅट सिव्हर-ब्रंटने अखेरपर्यंत नाबाद राहत अर्धशतक करून संघाला सहा विकेट्स राखून विजय मिळवून दिला.
(WPL Final Shafali Verma Dismisal Creat Controversy No Ball Decision Against Mumbai Indians)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
फक्त 44 चेंडूत टी20 क्रिकेटमध्ये शतक! क्विंटन डी कॉकसह दक्षिण आफ्रिकी संघ फायद्यात
ब्रेकिंग! बीसीसीआयकडून 2022-23 हंगामासाठी करारबद्ध केलेल्या 26 खेळाडूंची यादी जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळणार 7 कोटी