देशात कोणतीही आपत्ती येते, तेव्हा सेलिब्रिटींपासून ते क्रीडाजगतातील खेळाडूंपर्यंत सर्वजण आपापल्या परीने पीडितांच्या मदतीसाठी धावून येतात. अशातच आता भारतात जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे अनेक राज्यांना पूराचा फटका बसला आहे. यामध्ये पंजाब आणि हरियाणा राज्यांचाही समावेश आहे. आता भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनिया हरियाणा आणि पंजाबमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. याची माहिती त्याने सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. विशेष म्हणजे, त्याने व्यक्तींसोबतच जणावरांचीही मदत केली आहे.
बजरंग पुनिया (Bajrang Punia) याने त्याच्या स्वत:च्या कमाईतून पंजाब आणि हरियाणात 100-100 सुके राशनचे पॅकेट पाठवले आहे. याव्यतिरिक्त त्याने जणावरांसाठी 5 ट्रॉली चाऱ्याचाही समावेश आहे. त्याने शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांच्या नुकसान भरपाईसाठी सरकारकडे भरपाईची मागणीही केली आहे. याव्यतिरिक्त त्याने लोकांना अपील केली आहे की, जे पूरात ग्रस्त झाले नाहीत, त्यांनी लोकांच्या मदतीसाठी पुढे येऊन मदत करावी.
बजरंग पुनियाचे ट्वीट
भारतीय कुस्तीपटूने ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिले की, “पूर ग्रस्तांच्या मदतीसाठी मी थोडा प्रयत्न केला आहे. माझ्या वैयक्तिक कमाईतून मी 100 सुक्या रेशनचे पॅकेट हरियाणा आणि 100 पॅकेट पंजाबमध्ये पाठवत आहे. जणावरांसाठी 5 ट्रॉली चाऱ्याचीही सोय केली आहे. आपल्या सर्वांना एका संघाप्रमाणे या आपत्तीतून मार्ग काढायचा आहे. धन्यवाद.”
बाढ़ प्रभावित लोगों की मदद के लिए मैंने छोटी सी कोशिश की है.
मेरी निजी आय से मैं 100 पैकेट सूखे राशन के हरियाणा और 100 पैकेट पंजाब में भेज रहा हूँ और पशुओं के लिये 5 ट्रॉली चारे का प्रबंध किया है. हम सभी को एक टीम की तरह इस आपदा से पार पानी है. शुक्रिया 🙏 pic.twitter.com/dJySFRSk1S
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) July 19, 2023
पुनियाने यासोबत त्याच्या पोस्टमधून लोकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहनही केले. त्याने लिहिले की, “या कठीण काळात आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की, या आपत्तीतून मार्ग काढला पाहिजे. सरकारलाही विनंती आहे की, लवकरात लवकर तुम्ही या संकटातून मार्ग काढावा. लोकांनाही विनंती आहे की, सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि प्रशासनाला सहकार्य करावे. सर्वांना एका संघाप्रमाणे यातून मार्ग काढण्याची गरज आहे.”
सुक्या रेशनच्या पॅकेटमध्ये कशाचा समावेश?
बजरंगने सोबतच याचीही माहिती दिली की, त्याने सुक्या रेशनच्या पॅकेटमध्ये तांदुळ, साखर, पीठ, डाळ, चहापत्ती आणि तेलाचा समावेश आहे. (wrestler bajrang punia to help victim of punjab haryana flood see twitter post)
महत्त्वाच्या बातम्या-
काय राव! बड्डे ईशानचा आणि रोहितने मागितले गिफ्ट, म्हणाला, ‘तूच टीम इंडियासाठी…’
विंडीजच्या घसरणाऱ्या स्तराविषयी भारतीय कर्णधाराला सवाल, रोहित काय म्हणाला लगेच वाचा