टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये भारताने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी (२३ जुलै) भारताच्या खात्यात पदकाची कमाई झाली होती. वेट लिफ्टर मिराबाई चानूने ४९ किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले होते. यानंतर ती सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागली. यासोबतच आता भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. कुस्तीपटू प्रिया मलिकने भारतीयांची मान उंचावली आहे. तिने हंगेरीच्या बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे. यामुळे आता तिच्यावरही कौतुकाचा वर्षाव होत आहे.
प्रियाने जागतिक कुस्ती स्पर्धेत ७३ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे. तिने अंतिम सामन्यात बेलारूसची कुस्तीपटू केसेनिया पट्टापोविचला ५-० ने पराभूत करत हा कारनामा केला आहे. (Wrestler Priya Malik Clinches Gold For India At World Cadet Wrestling Championship In Hungary )
संदीप सिंग यांनी दिल्या शुभेच्छा!
प्रियाच्या या कामगिरीनंतर हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांनी तिला शिभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीट करत लिहिले की, “महिला कुस्तीपटू प्रिया मलिक हरियाणाच्या मुलीला हंगेरीच्या बुडापेस्टमध्ये आयोजित केलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्यामुळे हार्दिक अभिनंदन.”
congratulations to the wrestler daughter Priya Malik of Haryana for winning the gold medal in the 73 kg category of the World Cadet Wrestling Championship in Budapest, Hungary. pic.twitter.com/cGVTvmfTUF
— Sandeep Singh (मोदी का परिवार) (@flickersingh) July 25, 2021
यापूर्वी तिने २०१९ मध्ये पुणे येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले होते. त्याचबरोबर त्याचवर्षी दिल्ली येथे झालेल्या १७ व्या स्कूल गेम्समध्येही सुवर्ण पदकाची कमाई केली होती. तसेच २०२० मध्ये पटना येथे राष्ट्रीय कॅडेट चॅम्पियनशीपमध्येही सुवर्ण पदक आपल्या नावावर केले होते, तर २०२० मध्येच तिने राष्ट्रीय स्कूल खेळांमध्ये सुवर्ण पदकावर आपली मोहोर लावली होती.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-टोकियो ऑलिंपिक: भारताची निराशाजनक सुरुवात, नेमबाज मनु आणि यशस्विनी पदकाच्या शर्यतीतून ‘आऊट’
-बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूची विजयी सुरुवात, मोठ्या अंतराने प्रतिस्पर्धी पोलिकारपोव्हाला चारली धूळ