fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

वृद्धिमान साहा बनला सुपरमॅन, घेतले हे दोन एकहाती कॅच, पहा व्हिडिओ

पुणे। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडीयम, गहुंजे येथे दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात 326 धावांची आघाडी घेतल्यानंतर आज(13 ऑक्टोबर) भारताने चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला फॉलोऑन दिला आहे.

त्यामुळे आज पुन्हा दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या सत्राखेर 7 बाद 172 धावा केल्या आहेत. या डावात भारताचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहाने दोन शानदार झेल घेतले आहेत.

साहाने सुरुवातीला उमेश यादवच्या गोलंदाजीवर दक्षिण आफ्रिकेच्या थेउनिस डी ब्र्यूनचा झेल घेतला. उमेशने 6 व्या षटकातील चौथा चेंडू लेग स्टंम्पच्या बाहेर जाणारा टाकला. या चेंडूला  डीब्र्यूनने लेगसाईडला फ्लिक केला. पण साहाने डावीकडे झेप घेत शानदार एकहाती झेल घेतला. त्यामुळे डीब्र्यूनला 8 धावांवर विकेट गमवावी लागली.

विशेष म्हणजे साहाने डीब्र्यूनचा पहिल्या डावातही झेल घेतला होता.

तसेच दुसऱ्या डावात साहाने डीब्र्यूनची विकेट घेतल्यानंतर काहीवेळातच दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसचाही शानदार झेल घेतला. अश्विनने टाकलेल्या 24 व्या षटकातील तिसऱ्या चेंडूला डूप्लेसिसच्या बॅटची कड लागली आणि चेंडू साहाकडे गेला.

पण सहाच्या हातून चेंडू निसटला. पण लेगेचच सहाने चेंडू पकडण्याचा दुसरा प्रयत्न केला पण त्यावेळीही चेंडू साहाच्या हातातून उडाला. पण अखेर साहाने उडी मारत हा झेल घेतला आणि डूप्लेसिस 5 धावांवर बाद झाला.

साहाने घेतलेल्या या झेलांचे व्हिडिओ बीसीसीआयने अधिकृत वेबसाईटवर शेअर केले आहेत.

You might also like