भारतीय संघाने न्यूझीलंडला चार विकेट्सने हरवून पियन्स ट्रॉफी 2025चे विजेतेपद जिंकले. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अपराजित राहिला, कोणताही संघ त्याच्यासमोर टिकू शकला नाही. आता सर्व भारतीय खेळाडू पुढील दोन महिने आयपीएलमध्ये खेळतील. त्यानंतर पुन्हा 2025 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना जूनमध्ये होईल. WTC 2025 चा अंतिम सामना 11 जून रोजी दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळला जाईल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ पहिल्यांदाच जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने गेल्या वेळी WTC फायनल जिंकली होती. कांगारु संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळेल. दक्षिण आफ्रिकेचा सध्याचा कसोटी कर्णधार टेंबा बावुमा आहे. ऑस्ट्रेलियन संघाची कमान वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सकडे आहे.
अंतिम सामना पॉइंट्स टेबलमधील टॉप-2 संघांमध्ये खेळला जातो.
दक्षिण आफ्रिकेचा संघ 2023-25 च्या WTC च्या पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. संघाने एकूण 12 सामने खेळले, त्यापैकी त्याने 8 जिंकले आणि फक्त 3 सामने गमावले. 69.44 पीसीटीसह संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. ऑस्ट्रेलियन संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. ज्यात त्यांनी 19 सामने खेळले, त्यापैकी 13 जिंकले आणि फक्त चार गमावले. पॉइंट टेबलमध्ये टॉप-2 मध्ये असलेल्या दोन संघांमध्ये WTC फायनल खेळला जातो.
आतापर्यंत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे दोन सत्र पूर्ण झाले आहेत. हा तिसऱ्या सत्राचा शेवटचा सामना असेल. याआधी दोन WTC फायनल झाल्या आहेत, ज्यामध्ये न्यूझीलंडने एकदा आणि ऑस्ट्रेलियन संघाने एकदा विजेतेपद जिंकले आहे. दोन्ही वेळा भारतीय संघाला अंतिम फेरीत दारुण पराभवाचा सामना करावा लागला.