भारत आणि न्यूझीलंड यांच्यात साउथम्पटन येथे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताचा डाव अवघ्या २१७ धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाखेर (२० जून) २ गडी गमावत १०१ धावा केल्या आहेत. अशातच या ऐतिहासिक सामन्यात साधे अर्धशतकही करू न शकलेल्या अजिंक्य रहाणेच्या फलंदाजीबाबत माजी भारतीय क्रिकेटपटू व्हिव्हिएस लक्ष्मण यांनी आपले मत मांडले आहे. याबरोबरच भारतीय संघाच्या निराशाजनक फलंदाजीबाबतही ते बोलले.
भारतीय संघाचे माजी फलंदाज लक्ष्मण यांनी भारतीय संघातील फलंदाजांच्या कामगिरीवर निराशा व्यक्त केली आहे. त्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या स्तंभात लिहिले कि, “रविवारी भारतीय संघातील फलंदाजांची भीती बाहेर उमटली होती. जेव्हा न्यूझीलंडच्या क्लास आणि खोली असलेल्या गोलंदाजांनी साऊथम्पटनच्या मैदानावर भारतीय संघाचा डाव संपूष्टात आणला होता. न्यूझीलंड संघातील गोलंदाजांनी मदत मिळणाऱ्या वातावरणाचा पुरेपूर फायदा घेतला आणि भारतीय संघातील फलंदाजांच्या शिस्तीची परीक्षा देखील घेतली.”
तसेच त्यांनी पुढे लिहिले कि, “भारतीय संघाच्या दृष्टीकोनाने पाहिले तर भारतीय संघातील फलंदाजांकडे न्यूझीलंड संघातील गोलंदाजांच्या प्रश्नाचे उत्तर नव्हते. त्यामुळेच ३०० धावांचा विचार केला असताना, भारतीय संघाला अवघ्या २१७ धाव करण्यात यश आले. त्या धावांपर्यंत पोहचायचे होते तर, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेला टिकून फलंदाजी करणे गरजेचे होते. परंतु विराट कोहली अवघ्या ४४ धावा करत माघारी परतला.” (WTC final : Ajinkya Rahane dismissal was disappointing says vvs laxman)
रहाणे बद्दल बोलताना लक्ष्मण म्हणाले…
त्यांनी लिहिले कि, “अजिंक्य रहाणे सर्वात निराशाजनकरित्या बाद झाला. हे पहिल्यांदा होत नाहीये जेव्हा तो शॉर्ट चेंडूवर बाद झाला आहे. तो गतवर्षी क्राइस्टचर्चमध्ये देखील शॉर्ट चेंडूंवर बाद झाला होता. त्याला एकतर तो चेंडू खेळायला शिकावे लागेल किंवा त्या चेंडूच्या लाईनमधून कसे बाहेर यावे हे शिकावे लागेल. कारण नेहमीच पूल शॉट खेळणे घातक ठरू शकते.”
महत्वाच्या बातम्या
बुमराहच्या सुमार कामगिरीमुळे पत्नी संजनावर नेटकऱ्यांनी साधला निशाणा, उमटल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
‘रहाणे स्वार्थी, आपलं अर्धशतक पूर्ण करण्याच्या नादात बाद झाला,’ दिग्गजाचे मोठे वक्तव्य
तिसऱ्या दिवशी टीम इंडियाची घसरगुंडी, ‘या’ चुकांमुळे कसोटी चॅम्पियनशीप जेतेपद धोक्यात!